भाग एक -
समिधा तिच्या बहिणीच्या घरी गेली होती, समिधाची बहीण मेधाने तिला काही कामानिमित्य घरी नेले होते. मेधा ही प्लॅट मध्ये राहत होती. तिच्याच खालच्या फ्लोअर वर अनुजा राहत होती. तिला एक छोटी मुलगी होती. अनुजा व मेधाचे छान जमायचे. अनुजा शतपावली करिता वरच्या मजल्यावर जात असे, तेव्हा मेधाला बोलून जायची. सगळी कामे आटोपल्यावर अनुजा मेधाकडे बसायला यायची. अनुजाला समिधा खूप आवडायची.... आणि मुळात समिधा कोणालाही आवडण्यासारखीच होती. धारदार आणि तीक्ष्ण नाक, लालबुंद आणि कोमल ओठ, इवले इवलेसे कान, टपोरे डोळे आणि त्या डोळ्यात तेज, गालावर नेहमी हास्य, कितीही थकून असली तरी त्याचे हसून स्वागत करणारी समिधा, मध्यम उंची, अंगात हवी तेवढीच, पर्सनॅलिटी तर कोणासही भुरळ पडणारी, कोणीही स्त्री आली तरी तुमची बहीण दिसायला सुंदर आहे हो असेच म्हणायचे. दिसायला जेवढी सुंदर तेवढीच घरकामात देखील पटाईत होती. सगळं घरकाम ती अत्यंत चोखपणे करत होती. आणि हाताला चवदेखील उत्तमच.....कोणत्याही कामाला कधीच नाही म्हणत नसे. बर नुसतीच दिसायला सुंदर किंवा घरकामात पटाईत नव्हती तर अभ्यासात पण हुशार होती. समिधाची PhD झाली होती, तेही अव्वल दर्जात. घरच्यांना समिधाचे खूप अप्रूप होते. समिधा वाण आणि गुण दोन्हीने आपली कीर्ती पसरवत होती.
जेव्हा मेधा कडे कोणी पाहुणे आले तर ते तिला बघून कॉमेंट करायचेच पण काम बघून आणि शिक्षण बघुन सगळे नवल ही करायचे. अशातच समिधा आणि अनुजा यांची देखील ओळख झाली. अनुजालाही समिधाचा स्वभाव, नीटनेटकेपणा, आणि शिकलेली असून सुद्धा अत्यंत साधेपणाने राहणारी समिधा आवडायची.
बरेच दिवस झाल्यानंतर अनुजाचा भाऊ अनुजाकडे राहायला आला. अगदीच एक दोन दिवस झाले असणार तोच अनुजाच्या डोक्यात एक विचार चमकला. ती लगेच वर आणि आणि समिधाला दुसऱ्या रूममध्ये ज सांगून मेधा च्या रूम मध्ये गेली. तिने घट्ट दार लावून घेतले.....
अग अनुजा दार का लावतेस ?
अग मेधा मला जरा तुझ्याशी बोलायच आहे.
अग पण दार लावून काय ?
अरे ऐक ना मेधा, विषय समिधाचा आहे.
का ग काय केलं तिने?, काही बोलली का ती ?
अग हो हो किती प्रश्न करशील....ती काहीही बोलली नाही
मग काय झालं.....
हे बघ मेधा माझा भाऊ दोन तीन दिवस झाले माझ्या घरी आला आहे. तो इंजिनिअर आहे. त्याचे जरा नेट चे काम असतात ते माझ्या माहेरी काही होत नाही म्हणून तो इथे आलाय काही दिवस...
अग मग उत्तमच आहे की, तेवढेच सोबत वेळ घालता येईल तुम्हाला....
अग हो पण आता त्याचे लग्न करायचे बोलत होते घरचे.
होय का, मग शोधली का मुलगी ?
हो तुझ्या ओळखीची आहे.
अग बाई हो का....कोण बरे ती ?
समिधा...!!!
काय....???
मेधा अक्षरशः ओरडलीच.
अग मेधा....ऐकून तर घे..समिधाला मी ओळखते आणि माझ्या भावाला देखील समिधा सारखीच बायको हवी आहे.
अग पण मी काय सांगू यावर.. आई बाबा काय तो निर्णय घेतील....
मेधा निर्णय तेच घेतील अग... पण दोघांनी एकमेकांना आधीच ओळखून घेतले तर किती बरे ना..
म्हणजे म्हणायचं काय ग तुला...
हे बघ, दोघे भेटतील, स्वभाव मिळतील तर घरच्यांना बोलून घेताच येईल....ही पण एक प्रकारची पाहनीच असेल ना...?
ये अनुजा, काय बोलतेस हे...?
हे बघ दोघांची स्वभाव नसतील पटत तर विषय पुढे नेउच नाही ना....पण आधी त्यांना भेटू तर दे.....
आयडिया चांगली आहे, पण कसे भेटणार ते....
अग माझ्या घरीच...
बघ मी समिधा बद्दल माझ्या भावाला सगळे सांगितले आहे, पण तो बोलला की समिधाला यातले काहीही सांगायचे नाही....
असे का बरं....?
अग मग ती त्याला खुलून बोलणार नाही ....मग त्यांची भेट औपचारिक होईल ना....
पण माझा नवरा हे ऐकणार नाही...
अग माझाही कुठे ऐकणार आहे, पण ते दोघे नसताना आपण बघू.
अग पण एवढा मोठा निर्णय असा कसा घ्यायचा....
आपण लगेच जुळवून आणत नाही गं....जर पटले तर बघू...आणि नंतर प्रॉब्लेम झाल्यापेक्षा आधी पारखून घेतलेल केव्हाही बर ना....तू माझ्या भावाला ओळखते, मी समिधा ला ओळखते..दोघेही आपल्याला माहीतच आहे आणि त्याचे जर स्वभाव जुळले तर पाहणीतले चांगलेच ना....आता जमाना कसा झालाय माहित आहे ना तुला.....
हो अनुजा. पटतंय मला, पण आपले असे करणे योग्य राहील का???
अगदी योग्य राहील मेधा.... एकदा तरी भेट झाली की, मी वैभव शी बोलते. त्याला काय वाटत ते बघू नंतर समिधा लाही याविषयी बोलूच काय पटतंय ना....
हो बघूया.... निदान आपल्या पिढीपेक्षा यांना एवढे तरी स्वातंत्र्य देता येईल.
म्हणूनच बोलले तुला मी.
उद्याच आपण बघूया प्रयत्न करून.....
चालेल.
बर मेधा निघते मी.
दोघींनी ठरल्याप्रमाणे नियोजन केले.....
भाग दोन -
मेधा अग कशी आहेस ? अनुजा दुसऱ्याच दिवशी आली.
दोघीच्या गप्पा सुरु होत्या समिधा सगळे काम आवरून तिथे बसायला लागली तोच अनुजा बोलली
अग मस्त वातावरण आहे ना आज ?
हो गं, खूपच मस्त.
समिधा आपल्या मोबाईलमध्ये बघत होती
तोच अनुजा ने मेधाला मांडीला चिमटा काढला.... मेधाच्या लक्षात आले.
आज शिरा खायची इच्छा होत आहे...
समिधा बोलली , मी करते की मग ....
अनुजा लगेच बोलली,
अग माझे व्रत आहे. कोणकडले खायला चालत नाही तू असे करते का समिधा...
बोला ना ताई, समिधा बोलली.
त्यावर अनुजा बोलली,
अग तू माझ्या घरी जा आणि तिथून करून आन....
पण ताई इथे केला तर काय हरकत आहे ?
अग पण मला नाही ना चालणार ते.
ताई तुम्ही हे सगळं मानता का ???
अग प्रश्न नको ना करू, आन ना प्लिज
बर घरी कोण आहे ???
आहे की भाऊजी तुझे
बर जाते....
असे म्हणून समिधा अनुजाच्या घरी गेली.
तिने दाराची बेल वाजवली....
आतून दार उघडले.
दार उघडणारे भाऊजी नव्हते, म्हणून ती त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागली. तिच्या नजरेचा चाळ घेत वैभव म्हणाला,
मी अनुजा ताईचा भाऊ....
ती त्याच्याकडे मंद स्मित करत म्हणाली,
मला आत जायचे आहे..
आता त्याच्या लक्षात आले होते की तो अजूनही दारातच उभा आहे.
ओ, सो सॉरी... असे म्हणत त्याने तिला जाण्यासाठी जागा दिली....
समिधा लगेच स्वयंपाक घरात गेली तिच्या पाठोपाठ तो ही आला होता तो दारातच उभा होता.....तिची चाललेली शोधाशोध बघून तो तिला म्हणाला,
काही हवंय का ???
खरं तर हो... मला साजूक तूप हवंय
खर तर मलाही माहीत नाही पण आपण शोधुया म्हणत तो ही शोधू लागला....
शेवटी त्याला तुपाचा डबा सापडला...
तो तिच्याकडे देत म्हणाला,
हॅलो मी वैभव.
त्याच्या हातचा डबा घेत तिनेही आपले नाव सांगितले,
मी समिधा..... ताईकडे आली आहे.
ओहह, छान नाव हा !
धन्यवाद.....
मी इंजिनिअर आहे....गावाला नेट चालत नाही म्हणून सध्या मी इथे आलोय काही दिवसासाठी...
तिने शिरा बनवतच हो का असे म्हंटले, व ती शिरा बनवू लागली.
तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता ती काहीच उत्तर देत नाही म्हणून तो तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत होता.
तुम्ही कशा आल्या इथे ?
ताईचे काम होते...
आणि तुमचे शिक्षण????
PhD झाली आहे.
अरे वा....मग पुढे
काय ?
पुढे काय करणार आहे लेक्चरशिप...की
त्याचे बोलने अर्धवट सोडून ती त्याला म्हणाली,
माझा शिरा झालाय.....निघते मी.
अहो पण ...ऐका तर....
ती काहीही न ऐकता तिथून निघून गेली.
तो तिच्याकडे बघत स्वतःशीच म्हणाला,
सुंदर व्यक्ती अशाच असतात का ???
भाग तीन-
समिधा ने शिरा दोघींच्या पुढ्यात ठेवला व रूममध्ये निघुन गेली.
समिधा काहीही बोलत नाही बघून दोघीही मनात हसल्या व अनुजा म्हणाली,
घरी जाऊन वैभवला विचारते मी शिरयाबद्दल ...
दिघीही मनसोक्त हसल्या. अनुजा घाईघाईने घरी गेली.
लगेच वेळ काढून ती परत आली
अग मेधा, ती काही बोलली नाही वैभवला....हो - नाही, एवढच बोलली म्हणे.... पण वैभवला तिचे वागणे अपेक्षितच होते असे बोलला तो....
मला वाटलंच समिधा काहीही बोलणार नाही.
अग हळूहळू बोलतील ते....
बर...नंतर अनुजा पुढचे नियोजन करू लागली....
यावेळेस मेधा बोलली .
ये समू...जरा अनुजा कडे कोणीतरी येणारे... तर तू तिला रांगोळी काढून दे ना...ती आली होती तुला बोलवायला...
बर ताई म्हणत समिधा अनुजा कडे गेली....
अनुजा ताई ....रांगोळी काढायची आहे ना ?
हो. अरे वैभव....
काय ग ?... म्हणत तो बाहेर आला...
समिधाला बघून तो मनात हर्षला. अनुजा म्हणाली,
अरे समिधा रांगोळी काढायला आली, तिला तू मदत कर.... मी आहे आत....
अग ताई नको ना. मी करेल एकटी...
अग करेल तो मदत..... असे म्हणत अनुजा आतमध्ये निघून गेली.
समिधा बाहेर हॉलमध्ये रांगोळी काढत बसली. तिच्या बाजूला वैभव ही बसला....
काल तुम्ही बोलणे अर्धवट सोडून दिले...
कशाबद्दल,
तुम्ही पुढे काय करणार या बद्दल....
ठरवलेलं नाही अजून.
म्हणजे कळले नाही ?
काही नाही.
तुम्हाला माझ्याशी बोलण्याची इच्छा नसते का ??? तसे असेल तर सांगा मला म्हणजे मी बोलणार नाही.
तिने वैभवच्या बाबतीत जरा कडकपणे घेतले होते, हे तिच्या लक्षात आले.
सॉरी... मी जरा जास्तच कडक पणे घेत आहे. पण मला कोणतेही नाते नको आहे, म्हणून मी असे वागते....म्हणजे मलाही असे वागणे आवडत नाही...
मैत्री पण नाही ???
तिने नजर चुकवत लगेच रांगोळी काढायला घेतली...
मे आय..
तिची रांगोळी पूर्ण झाल्यावर त्याच्यात रंग भरण्यासाठी तो परवानगी मागत होता...
तिने लगेच आपला हात पुढे केला.
बघना समिधा.... ही रांगोळी एवढी सुंदर आहे, पण रंगा विना एकदम अधुरी आहे. तसेच आपले जीवन आहे. विना रंगाचे.... त्यात आपण रंग नको का भरायला....?
तुम्हाला काय म्हणायचे आहे....?
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की......
असे म्हणत असताना त्याचा हात तिच्या हाताला लागला....दोघांचे लक्ष हातावर गेले. त्याने लगेच त्याचा हात मागे घेतला.
I am so sorry समिधा.... माझं लक्ष नव्हतं...
हमम....
ती लगेच तिथून उठून गेली. रांगोळी घरात ठेवत अनुजाला न बोलताच तिच्या घरी गेली.
अनुजा तशीच बाहेर आली..
काय रे वैभव, अशी का गेली ती अचानक.....
काही नाही ताई.... मला वाटलं होतं ही एक लेख असेल पण आता वाटतंय ही तर एक पुस्तक आहे....तेही रहस्यमय.... एक दोन पानाने उलगडणार नाही... अवघ पुस्तक वाचावे लागणार..
ये वैभव काय बोलतोयस ? मला काही कळलं नाही....
ताई प्रेमाची भाषा आहे.... मलाही अजून कळले नाही....
भाग चार -
अग ताई मी कपडे आणायला गच्चीवर जात आहे.
हो घेऊन ये....
पावसाचे वातावरण असल्याने वातावरण खूप मस्त वाटत होते समिधा गुणगुणत वर गेली.... ती गाणे म्हणतच कपडे काढत होती तिच्या मागून आवाज आला....
म्हणजे तुमचा आवाजही गोड आहे.
तिने मागे वळून बघितले मागे वैभव उभा होता त्याला बघत ती म्हणाली,
तुम्ही इथे कसे काय ???
निसर्गाचा आनंद फक्त तुम्हालाच घ्यायला आवडतो का ???
म्हणजे ?
अग हवा घ्यायला आलेलो.
पुन्हा तो राहून म्हणाला,
तुला चालेल ना मी तू मी करून बोललेलं...
न चालायला काय झालं....
एक विचारू समिधा,
मी एवढा हुशार नाही, पण मला तुला बघितल्यावर एवढं कळत की तू कोणता तरी विचार सतत करत असते...
ती कपडे काढत म्हणाली,
माणसांची पारख आहे तुम्हाला, पण माझ्या बाबतीत असे का वाटते ???
तुला पहिल्यापासून मला असच वाटतंय.... यापूर्वी कोण्या मुलीचा कधी विचार केला नाही, म्हणून कदाचित असू शकते.
बर मी जाते.....
ये समिधा, ऐक ना....
मागे वळून बघत ती तिथेच थांबली
मला तुझ्याशी मैत्री करायची आहे.
पण मला नकोय तुझी मैत्री वैभव...Sorry तुमची मैत्री....
अग चालेल.... तू मला एकेरी हाक मारलीस तरी काही अडचण नाही...
हे बघ वैभव.... तुला एक सुचवते, तू माझ्यापासून दूरच राहा.. प्लिज...
अरे समिधा, तू मला फालतू मुलगा नको समजू प्लिज, मला आवडत तुझ्याशी बोलायला म्हणून....
त्याचे बोलणे अर्धवट ठेवत समिधा मधेच बोलली,
तुझा काय प्रॉब्लेम आहे वैभव, मला नाही बोलायचे हे तुला कळत कसे नाही... दूर राहा माझ्यापासून तू, कळलं.....
ती आवाज चढवत म्हणाली.
तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. थोडा वेळ ही गच्चीवर बसून राहिली. त्याला असे बोलल्याचे तिला वाईट वाटत होते. आणि ती स्वतःशीच विचार करू लागली की मी अशी नसतांना का वैभवशी अशी वागते आहे?. माझ्या मनातला राग मी त्याच्यावर का काढला? उगाच का चिडतेय मी त्याच्यावर ? असा विचार करत असताना तिला वाईट वाटले..... ती कपडे घरात टाकून अनुजाच्या घरी गेली. अनुजा आणि तिचा नवरा बाहेर कुठेतरी गेले होते. तिने दार वाजवतात वैभव न दार उघडले....
ताई घरात नाही आहे.
मी तुला बोलायला आले आहे.
गच्चीवर बोलले ते पुरे झाले...
त्याबद्दलच बोलायला आले आहे,
तो सरळच रूममध्ये निघून गेला....
ती त्याच्या मागे गेली,
वैभव खरं तर मला तुझ्याशी तसे बोलायचे नव्हते, पण....
पण काय समिधा ? बोललीसच ना..
वैभव I am really very sorry...मला माहित आहे कारण नसताना चिडले मी, आणी का चिडले ते मलाही नाही ठाऊक....
असे म्हणून समिधाच्या डोळ्यात पाणी आले, ते वैभवच्या नजरेतून सुटले नाही. तिचे अश्रू बघून तोही जरा भावुक झाला,
अग हे समिधा, वेडी आहेस का???
तो तिच्या खांद्याला हात लावणारच होता की त्याने झटकन हात मागे घेतले आणि म्हणाला,
अग समिधा डोळे पूस बघू आधी तू...
ती तिथून न काही बोलतच निघून गेली. तिच्या जाण्याच्या वेळेला अनुजा आली
काय रे वैभव....काय म्हणाली समिधा...
नेहमीप्रमाणे कोड्यातच उत्तर ठेऊन गेली.
हे बघ वैभव, तिला समजून घे आणि नंतर काय तो निर्णय घे...
ताई निर्णय तो झालाच आहे.... आता तिला समजून घेतोय फक्त... .
काही न समजले असतानाही बर म्हणत ती घरात निघून गेली.....
वैभव तिच्या वाटेवर अजूनही बघत होता....
- तेजस्विनी प्र. राऊत
भाग पाच-
आज समिधा गच्चीवर सहज म्हणून गेली होती. गच्चीचा एक भाग त्या बाजूला गेल्याशिवाय दिसत नाही. ती एक बाजूला होती. असेच फिरत असताना निसर्गाचा आनंद घेत होती.
हवा के झोके आज मौसमोसे रूट गये,
फुलो के शोके आज भवरे आके लूट गये,
बदल रही है आज जिंदगी की चाल जरा...
इसी बहाणे क्यू ना मै भी दिलका हाल जरा...
सवार लु... हाय सवार लु.........
असे गाणे गुणगुणत समिधा शतपावली करत होती तोच तिला मागून आवाज आला...
ये राते ये मौसम नदी का किनारा,
ये चंचल हवा....
तिने मागे वळून बघताच पुढची चाल दोघांनी मिळून गायली..
कहा दो दिलोने,
के मिलकर कभी हम ना होंगे जूदा.....
समिधा मन मोकळे पणे हसली वैभव तिच्याकडे पाहत म्हणाला,
किती सुंदर ना..
ती त्याच्याकडे बघत म्हणाली,
काय म्हणाला ?
तो नजर फिरवत म्हणाला,
सूर किती सुंदर जुळले ना....
अरे हो....मला आवडत हे गाणं..
छानच... मलाही आवडत, आपली आवड जरा जरा सारखीच येते ना.....
बर आज कशा काय फिरकल्या मॅडम इकडे तुम्ही....
सहज म्हणून कधी कधी आवडत निसर्ग बघायला...
हा ते पण आहेच.....
तू तुझे काम सोडून इथे....
जरा कंटाळा आलेला बसून म्हटले जरा शतपावली घ्यावी.....
छान केलंस......
समिधा.....
हा बोल...
तुला कशात आवड आहे ग ?
शिकण्यात...
म्हणजे..?
मला काहीही शिकायला आवडत..
That's ग्रेट.....
अजुन काय करायला आवडत ?
जे मनात असेल तेच करायला आवडत.
तु खुप कोड्यात बोलतेस समू...आयमिन समिधा......
कोड सोडविणे सोपं असत वैभव, पण कोड निर्माण करणे तितकेच अवघड....
पण कोडनिर्माण का करावं ???
कारण प्रत्येक वेळी सहज उत्तर देणे सोपे नसते....
मग उत्तराला कठीण करून उत्तर द्यायच ना....
उत्तर कठीण केले की प्रश्न सोपा वाटतो.
अर्थातच प्रश्न सोपा होणार असेल तर उत्तर अवघड कसे राहील ???
प्रश्न सोपाच असेल तर मग उत्तर का शोधायच ??
समिधा...हरलो बाई मी....
म्हणूनच प्रत्येक प्रश्न आणि उत्तर कठीण नसतात तसेच सोपेही नसतात वैभव.....
तुला बोलण्यात कोण हरवेल !
समिधा...
काय...
मी असे ऐकलंय, तू लग्न करणार आहेस .
माझं लग्न करून देणार आहेत.
म्हणजे ?
नीट विचार कर उत्तर मिळेल तुला...
पुन्हा कोडंच ?
मग सोडवून बघ ना.....चल वैभव निघते मी....
आणि माझे उत्तर ...
तुझ्या प्रश्नातच आहे....
ती पटापट पायऱ्या उतरून गेली....
त्याने केसातून हात फिरवला व स्वतःशीच म्हणाला,
हाय...ये लडकी मुझे उसका पती बनाकर ही छोडेंगी...चलो वैभव लेट्स बॅक टू वर्क.....
- तेजस्विनी प्र. राऊत
भाग सहा-
दाराची बेल वाजली म्हणून समिधा उठून उघडायला गेली....
अरे वैभव तू इथे....
का ग नको होतं का यायला ?
नाही म्हणजे जीजू घरी नाही आणि ताई तुझ्या कडेच आहे ना.....
म्हणून तर आलोय तुला कम्पनी द्यायला ...
अरे तसे काही नाही.
मग जाऊ का परत..?
सॉरी ये ना आत....
काय करत होतीस ?
हातातले पुस्तक दाखवत समिधा म्हणाली,
पुस्तक वाचत होते....
छान....छान
तू काम सोडून इकडे काय करतोय....
चला म्हटलं कोणाला एकटे सोडू नये.....
बर चहा घेणार का????
थोडा.....
ती उठून किचनमध्ये गेली तो सुद्धा किचनच्या दारात उभा राहिला....
तुझ्या कालच्या कोड्याच उत्तर शोधलं मी समिधा......
बर केलंस.
तूला लग्न का करायचं नाही....
मी कुठे बोलले की मला लग्न करायचं नाही.
तुझं कोड मला सुटलं खर पण त्यासोबत बरेच प्रश्न निर्माण करून गेलं....
आज कळलं मला तू का टाळत होती ते ?
मी काय टाळलं.
तुझं लग्न होतय म्हणून तू नोकरीचा विचार करत नाही आहेस ना...
नाही तसे काही...
त्याने तिचा हात धरला व म्हणाला,
माझ्या डोळ्यात बघून सांग एकदा....मी लगेच मान्य करेल....
हे बघ वैभव.....
नाही समिधा आज मला उत्तर दे...असे काय झाले आहे की तुला तुझ्या आजूबाजूला कोणीच नकोय ?
हा घे चहा...मला माझं शिक्षण वाया जाऊ द्यायचे नाही... मला लेक्चर शिप करायची होती, पण .....
पण काय समिधा..?
मध्येच विषय लग्नाचा निघाला....नाही नाही म्हणून शेवटी हार मानली.....तयार केली मला लग्नासाठी.. पण माझी इच्छा नाही असे नाही पण PhD केली, मेहनत केली, प्रसंगी भूक झोप मोडली आणि एवढे करून विषय लग्नाचा निघतो आहे....
मग तू सरळ सांग ना, की मला नोकरीला लागल्यावर लग्न करायचं...
नाही बोलू शकत आहे, म्हणून तर गप्प आहे मी...
दुपारच्या वेळेत ये, मी रिकामा असतो त्या वेळेला.... तोडगा निघेल यावर काहीतरी
चालू आहे तसे चालू द्यायचे वैभव....
लग्न करणार आहेस ना... मग सुरुवातच अशी नाराजीत करणार आहेस का ???
तुला वाटते तेवढ्या गोष्टी सोप्या नाहीत...
गोष्टी सोप्या नसतातच ग त्याला सोपे करावे लागणार ते ही आपल्यालाचं.....
हे बघ वैभव.....
तुला विश्वास आहे का माझ्यावर...?
अरे पण....
एकदा विश्वास ठेउन बघ... नाही तोडणार कधीच..
हम्मम्म...
अग काय हे एवढच हमम
मग काय बोलू ???
बस का...एवढं तर म्हण की तुझी मैत्री चालेल मला...
वैभव...
तिचे बोलणे तोडतच वैभव म्हणाला,
काही घाई नाही आहे बाई.... जेव्हा मनातून वाटेल तेव्हाच बोल...
अरे पण....
हम भी यही है, और तुम भी यही हो !
सिर्फ कुछ दिन के लिये वैभव...
कुछ दिन मे बहोत सारे घंटे होते है मॅडम...
अरे पण मला ...
बर ऐक ना.... मला उशीर होतोय..... नाहीतर बॉस गिळून घेईल मला.
चल निघू मी ?
यावेळेस समिधा त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत होती. कुठून तरी उमेदीचा किरण दिसत होता......आणि ती मनातच म्हणाली,
अरे मी केव्हाचा हेच बोलण्याचा प्रयत्न करतेय की, मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल...तेही अगदी मनातून...
- तेजस्विनी प्र. राऊत
भाग सात -
अनुजा ताई... येऊ का घरात ?
अग अशी विचारतेस काय... ये की घरात.
समिधा घरात गेली, इकडेतिकडे बघू लागली, अनुजाच्या लक्षात आले की ही कोणाला शोधतेय, ती म्हणाली,
वैभव रूममध्ये आहे.
ती चोरी पकडल्यागत म्हणाली,
नाही नाही...अ.. अ ते मी आपलं असेच....
बर बर अबकड वैभवला शिकव त्याला मराठी काहीही येत नाही....
ताई तसे काही नाही.....
मी कपडे धुवायला घेतले आहे, लवकर धुवावे लागणार तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही, मी जातेय बाहेर....
अनुजा हसतच बाहेर गेली,
ती वैभवच्या रूम कडे जायला निघाली. तिने दार वाजवले पण वैभव आतूनच म्हणाला,
Hmm ये ये.
ही आतमध्ये गेली तोच वैभवला बघून ती कावरी बावरी होऊ लागली, वैभव सताड पालथा पडला होता.... शर्ट काढून झोपलेला वैभव अंगावर पांघरून घेऊन होता.
वैभव....
वैभव उठून बघताच त्याला समिधा उभी दिसली तो ताडकन उठून बसला
समिधा तू.....
त्याने पांघरून अंगावर ओढले..समिधा ही त्याच्याकडे पाठ करून उभी होती, त्याने लगेच कपडे घातले
समिधा सॉरी
झाले का तुझे ?
हो झाले....ये ना बैस.
समिधा बाजूच्या खुर्चीत बसली...
वैभव....
हा बोल ना....
मी हेच बोलायला आले होते की, मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल...
तिने आपला हात शेक करण्यासाठी त्याच्या समोर धरला....
त्याने तिचा हात अलगत त्याच्या हातात घेतला. आणि हळूच बोलला,
माझा हात फक्त तुझ्याच हाती शोभतो....
काय बोललास हळूच ?
अग हेच की थँक्स म्हणणार होतो
Thank You.
दोघांनेही हात सोडवून घेतले.....
बर समिधा..... मी मेधा ताईशी बोललो...
काय बोललास ?
तुझ्या नोकरीबद्दल...
काय बोलली ती ?
तुझ्या घरी बोलणार आहे त्या.
अरे पण असे काय सांगितले तू की ती लगेच हो म्हणाली,
ओ हमारी बात है... तुमहें क्यू बताऊ...
सांग ना रे वैभव....
ना..... अजिबात नाही
बर ऐक....
त्याने लॅपटॉप तिच्याकडे केला तिला दुरून दिसत नव्हते, तो लॅपी मध्ये लक्ष देऊन बघत होता ही त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्याच्या लक्षात आले पण तो लक्ष नसल्यासारखे भासवू लागला.... त्याला ती बाजूला बसली तर शहारून येत होते....
काय झालं वैभव...
अरे काही नाही... लक्ष दे इकडे म्हणून तो तिला त्याच्या लॅपी वर दाखवू लागला...
हे बघ समू हे काही कॉलेजचे नाव आहेत आणि त्याखाली त्यांचे अड्रेस...नीट बघून घे...
याचे काय रे...?
इथे तू इंटरव्ह्यूला जाणार आहेस...
अरे पण...
सगळं माझ्यावर सोड....पुढच्या आठवड्यात इंटरव्ह्यू आहे त्याची तयारी कर....
अरे पण मी...
तू एकटी जाणार नाही आहेस, मी येणार आहो तुझ्या बरोबर...
आणि तुझे वर्क...
हा इंटरव्ह्यू रविवारला आहे... पुढची तारीख कळली की बघू काय करायचं ते....
समिधाच्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले.
अग ये वेडा बाई... रडतेस काय अशी...
वैभव...
असे म्हणत ती एकदम रडायला लागली. वैभवला काही समजत नव्हते तिचे सांत्वन कसे करावे याच संभ्रमात तो होता. त्याने त्याचा रुमाल त्याच्या हाती दिला. तिने अश्रू पुसले व तिथून ती निघायला लागली तोच वैभव ने तिचा हात पकडला....
तिने मागूनच त्या हाताकडे बघितले, तिला आवडले नाही असे समजत त्याने लगेच हात सोडवून घेतला. ती त्याच्याकडे वळली आणि त्याचा हात तिच्या हातात घेतला....
काळजी करू नको असेच म्हणणार होतास ना ???
हमम त्याने त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवला...
आता नाही काळजी मला.... निघू का ?
बर आणि हो तयारी कर इंटरव्ह्यू ची ओके.....
ती मंद हसत म्हणाली,
होय रे.... बाय .
तो नेहमीप्रमाणे केसातून हात फिरवू लागला आणि म्हणाला,
या पोरीने मला अक्षरशः वेड लावले यार....
- तेजस्विनी प्र. राऊत
भाग आठ-
हॅलो ताई.....
अरे वैभव... बाहेर काय उभा आहेस ये ना घरात....
ताई समिधा...
ती बाहेर गेली आहे...
अग ताई काय म्हणाले घरचे....
अरे ते म्हणताय आधी पाहणी होऊ दे...
ताई पण आता पाहणी होऊ शकत नाही... आधी तिचे नोकरीचे आणि नंतर पाहणी वगैरे..मी बोलू का घरी...
नको मीच बघते काय ते... तू नको काळजी करू...
तेवढ्यात समिधा आली.
कशाचे बघणार आहेस ताई...
मेधा आणि वैभव दोघेही एकमेकांकडे बघू लागले आणि वैभव बोलला
ये छोरी, ये हमारे विच दि गल है, तू बिच मे ना घुस....
बर चालुद्या तुमचे मी आलेच फ्रेश होऊन.
ये ! ये !
कोणी चहा घेणार का ???
दोघेही मोठ्याने बोलले,
मला हवाय...
समिधा चहा घेऊन आली तिने दोघांना चहा दिला आणि खुर्चीत तिचा कप घेऊन बसली.
मग कसे काय समिधा इंटरव्ह्यूची तयारी सुरू आहे ना...
हो अरे पण सगळं ब्लँक झाल्यासारखे वाटत आहे...
माझी काही मदत होईल का तुला...
नको तुझे काम असतात तुला....
I will manage समिधा....
नको..... मी करेल हँडल
मेधा ताई तुमची परवानगी असेल तर हिला दुपारी माझ्या ताईकडे पाठवत जा...
मी घेईल तयारी करून....अर्थात तुमची परवानगी असेल तरच.
मला काही हरकत नाही...
मग समिधाला ही काही हरकत नाही. हो ना समिधा
तो समिधाकडे बघत म्हणाला.....आणि तिचे बोलने न ऐकता तिथून निघून गेला... दुसऱ्या दिवशी मेधा समिधाला म्हणाली,
अग समिधा, झोपतेस काय तुला वैभव बोलावत होता ना.....त्याने मला कॉल केला होता. तुझा नंबर लागत नाही का???
माझा नंबर तर सुरूच आहे.
मग त्याने मला का कॉल केला ?
माझा नंबर नाही आहे त्याच्याकडे....
तू वेडी का ग ? जा लवकर...
तीने कितीही नाही म्हटले असते तरी मेधा पाठवणारच होती त्यामुळे ती सरळ निघून गेली....तिने बेडरूमचे दार वाजवले,
या मॅडम
म्हणजे तू वाटच बघतोय का.....
म्हणजे काय.... एक मिनिटं हा समु...हो सर सायंकाळी बोलूया आपण बाय....
अरे फोन वर घे बोलून मी बसते पुस्तक वाचत...
झालं मॅडम, या इकडे म्हणत त्याने आपल्या शेजारी एक खुर्ची टाकली, ती तिथे येऊन बसली....त्याने त्याच्या लॅपटॉप वर एक पेज सुरू केले आणि तिला तो सगळं समजावून सांगू लागला...ते ऐकता ऐकता तिला झोप येऊ लागली वैभवच्या ते लक्षात आले तो उठून गेला व तिच्यासाठी कॉफी घेऊन आला..
मॅडम घ्या कॉफी !
अरे नकोय मला.
त्याची गरज आहे तुला, कारण मी झोपू देणार नाही, खूप बाकी आहे तुझं आणि तीनच दिवस हाती आहेत आपल्या.....
वैभव...
चल बघ तिकडे लक्ष दे समु....
सायंकाळ कधी झाली दोघांनाही कळले नाही तेव्हा समिधा त्याला म्हणाली,
उशीर झालाय निघू का मी ?
बर चालेल, मीही ऑफिस चे काम घेतो जरा .....
अरे वैभव तुझा सेल दे ना...
कशाला ग.? त्याने काढून लगेच दिला.
Password सांग !
"Vaisam"
असा कसा रे पासवर्ड तुझा....
असेच आवडलं म्हणून.....
बर चल निघते मी....bye
तो नेहमीप्रमाणे केसातून हात फिरवत मनाशीच म्हणाला,
वेडी कुठली, दोघांच्या नावाचा पासवर्ड आहे हे पण कळले नाही....
- तेजस्विनी प्र. राऊत
भाग नऊ -
समिधा आणि वैभव यांची मैत्री छान जमली होती. त्याने तिला इंटरव्ह्यू साठी तिला खूप मदत केली होती. तिच्याकडून भरपूर तयारी करून घेतली आणि आज तिचा इंटरव्ह्यू होता.....
समिधा अग ये समिधा... अग आवर ना पटकन.
आले आले,
ती लगेच त्याच्या गाडीत बसली.
मेधा आणि अनुजा दोघीही वरून बघतच होत्या...
वैभव...
बोला मॅडम.
कसा होईल इंटरव्ह्यु..?
छानच होईल बघ.
समिधाला थंडगार हव्याने कधी झोप लागली ते कळलंच नाही.आणि वैभव ने सुद्धा तिला उठवलं नाही. कॉलेज जवळ येताच त्याने तिला उठवले.
समु उठ....
ती उठत नाही हे बघून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला...ती उठली आणि मनातल्या मनात तयारी करू लागली. दोघेही गाडीखाली उतरले आणि इंटरव्ह्यूला गेले. ती जेव्हा इंटरव्ह्यू देऊन आली तेव्हा तिने वैभवच्या मागे जाऊन बघितले. वैभव त्याच्या ऑफिसचे काम करत होता आणि त्याच्या डोळ्यावर प्रचंड झोप सुद्धा दिसत होती. तिला खूप वाईट वाटले की फक्त तिच्यामुळे वैभव ची फरफड होते आहे.....तिने त्याला आवाज दिला
वैभव...
इंटरव्ह्यू छानच झाला असेल.
बरा झाला.. वैभव दमलास का रे ?
नाही अग.
नक्की ?
अरे हो बाई.....निघायचे ना आता.
हो निघू पण आपण जाता जाता येथील एका मंदिरात जाऊ का ???
हो चालेल की
दोघेही मंदिरात गेले, आणि तेथून गाडी त्यांच्या गावाकडे वळवली.
वैभव
बोल की.
वातावरण कसलं भारी वाटतय ना ?
हो ना....मस्तच
मला एक खरं सांगशील ?
हा बोल ना.
तू रात्रभर झोपला नाही ना...
मस्त झोपलेलो.
खरं बोल.
अग उद्या ऑफिसचे काम आहे आणि तुझा इंटरव्ह्यू सुध्दा..म्हणून उद्याचे काम करून घेतो आहे....
तू नको येऊस इंटरव्ह्यूला
का ग ?
तुझी खूप दगदग होतेय अरे....
मला उलट बर वाटतय तुझ्या निमित्याने मला आत्ता बाहेर पडता तरी येतंय....
एवढं का करतोयस रे माझ्यासाठी...
मैत्रिण आहेस ना....,एवढं तर करायला हवे ना मी....
पण हे खूप होतंय अरे.. तुझे काम सोडून तू....
अग तुझ्याकडून पार्टी हवीय मला त्यासाठी तर एवढं करतोय मी.... दर महिन्याला एक पार्टी लागेल मला
हो पण वैभव.....
पण बिन काही नाही, ड्राईव्ह करणार का ???
मला नाही येत चालवायला... हा पण कधीतरी बाईकची ड्राईव्ह करूया ..
काय बोलतेस तुला बाईक येते तर...
हो जरा जरा ....
उद्याच्या इंटरव्ह्यूला माझ्या बाईक ने जाऊया चालेल ना....
नक्कीच.....
असे करत करत ते कधी घरी पोहचले ते लक्षात देखील आले नाही. दुसऱ्या दिवशी दोघे बाईक ने इंटरव्ह्यूला गेले. येताना समिधा बाईक चालवत होती....
अरे समु... मस्त चालवतेस ग तू बाईक...
पण नेहमी चालवत नाही...
हो पण तरी भारी चालवतेस....
मस्त वाटतय... पहिल्यांदा कोण्या मुलीच्या मागे बसलोय...म्हणजे यापुढे कुठे प्रवासाला बाईक वर जायचे झाल्यास तुला न्यायला पाहिजे सोबत.
का रे ?
मला बाईक चालवायला ड्रायव्हर तरी मिळेल....
काय रे वैभव तू.
अग मस्करी केली.....
आता बाईक तू घे.
अरे का...
नको आता.
बर....
दोघेही घरी आले. वर पायऱ्या चढत समिधा वैभवला म्हणाली,
एवढं नको करू माझ्यासाठी...
काय झाले आता ?
सवय नको लावून देऊन तुझी मला.
अरे पण मी कुठे सवय लावली....
मग काय... सतत तू बरोबर लागतो मला.
ओहहह ....
हा ना.... इथून मी गेल्यावर....
इथून तू गेल्यावर तुला कोणाचाच आधार लागणार नाही. कारण तू स्वतःच्या पायावर खऱ्या अर्थाने उभी राहणार....
असे होईल का???
का होणार नाही आपण काय उगाच लॉंग ड्राईव्ह ला फिरतो आहोत का.... मंद कुठली.
दोघेही निखळ हसले. समिधा घरी निघून गेली आणि हा केसातून हात फिरवत म्हणाला
सवय तर मला तुझी लागतेय समिधा.... आणि इथून पुढे तू सतत मला सोबत हवीय... अर्थात तुझी इच्छा असेल तरच......
- तेजस्विनी प्र. राऊत
भाग दहा-
समिधा आणि वैभव दोघेही चार पाच इंटरव्ह्यूला गेले होते. वैभवच्या डोक्यावर ताण वाढत होता. काम आणि समिधा हे दोन्ही दोन्ही सांभाळणे कठीण जात होते. पण तो मॅनेज करत होता. तिच्यासाठी चाललेली धडपड मेधा आणि अनुजा बघत होत्या. समिधा ही शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. त्याला कोणताही ताण वाढणार नाही याची ती खबरदारी घेत होती. पण वैभव ने तिच्यासाठी जे केले आहे ते कोणीही करू शकले नसते. मेधानी सगळ्या कॉलेजला वैभव चा नंबर दिला होता. अशातच 3 कॉलेज मधून समिधाला कॉल आला होता. वैभव ने ही गोष्ट समिधाला सांगण्याचे ठरवले. समिधा कपडे वाळत घालायला गेली होती तेव्हा हा तिच्या मागून गेला. तिचे लक्ष नसताना तिच्या मागून जोरात आवाज दिला. तशीच समिधा दचकन मागे बघत ओरडली.
वेडा कुठला..... किती घाबरले मी
अजून दचकणार आहेस.... तयारीत राहा....
चल.... राहूदे तू
अरे खरच ना ग.
बर सांग की,
असे नाही.
मग कसे ?
डोळे बंद कर.
हा केले.....
त्याने पटकन मोबाईल मधील मॅसेज बॉक्स उघडला आणि तिच्या समोर करत म्हणाला,
हा आता उघड डोळे.
तिने उघडताच त्याच्या हातचा मोबाईल अक्षरशः हिसकावत घेतला आणि मॅसेज वाचू लागली. समिधाचा आनंद गगनात मावत नव्हता. तीने वैभवला मीठी मारायला हात वर केले, पण काही समजत ते लगेच मागे घेतले आणि त्या दोन्ही हाताने वैभवाच्या हाताला घट्ट पकडले. पण लगेच तिच्या चेहर्यावर एक काळजी दिसून आली. तिचा चेहरा पडला. हे वैभव च्या लक्षात आले...
काय झालं समु ?
अ...अ... काही नाही.
काहीतरी झालंय सांग पटकन.
नाही काही म्हणत ती त्याच्यापासून दूर गेली तोच वैभव तिच्या मागे गेला.
काय झालं? नाही का सांगणार समिधा?
वैभव.... खूप आनंद झालाय तीन ठिकाणाहून बोलावणे आले, पण आता काळजी हीच आहे की घरचे काय म्हणतील..? त्यांना मी नोकरी केलेली नको होती.
अरे त्याची काळजी नको करू समु,
पण वैभव हे जर त्यांना कळलं तर मला नोकरी करू देणार नाही.
तुझा माझ्यावर आहे ना विश्वास ?
स्वतःपेक्षा ही जास्त.
मग सगळं माझ्यावर सोड....
तिने पुन्हा त्याच्या हातात हात दिला.
सगळ्याच साठी धन्यवाद वैभव.....
चल वेडी कुठली...
वैभव आणि समिधा खाली आले त्याने ही बातमी मेधा आणि अनुजाला कळवली. दोघींना आनंद झाला पण खरी कसरत आता होणार होती....त्यावर मेधा बोलली.
आता कसे करायचे वैभव ?
ताई, आता तुम्ही सांगायला हवं की समिधा नोकरी करतेय...तिची बाजू तुम्ही मांडायला हवी, तुम्ही कन्व्हेंस करू शकता.
अरे पण माझं ऐकणार नाही घरचे.
ताई इंटरव्ह्यूचे तर ऐकले ना, आताही ऐकतील हो ते .... आणि आता तर समिधा लग्नाला देखील तयार असेल हो ना समिधा..?
नोकरी लागली की मी लग्न करेल. काही हरकत नाही मला...
अनुजा त्यावर जोरात बोलली,
म्हणजे तू सगळं समिधाला सांगितलंस
वैभव अनुजाकडे डोळे मोठे करून खुणावत होता ते समिधा ने बघितले.
काय सांगणार होता मला वैभव ताई....
वैभव ने गोष्ट मोडून नेली. तिनेही फार आग्रह धरला नाही. वैभव ने सांगितल्याप्रमाणे मेधा घरी बोलायला तयार झाली. वैभव आणि समिधा दोघेही एकमेकांकडे बघून हसत होते......- तेजस्विनी प्र. राऊत
साथ ( भाग अकरा )
समिधाचे बाबा मेधाकडे आले होते .मेधाने समिधाच्या नोकरीचा विषय काढला. घरी तर एकदम आभाळच कोसळले.
तिच्या वडिलांचा आवाज कोसळला,
आपल्या घरात नोकरी करायची नाही हे माहीत असतांनाही तू विषय तरी कसा काढू शकतेस,
पण बाबा ती हुशार आहे,
तिला नोकरी करायची असेल तर नवऱ्याकडे करेल...
पण बाबा ती आत्ता नोकरीला लागली तर नवरा अजून चांगला मिळेल ना...
म्हणजे आम्ही वाईट शोधून देतो असे म्हणायचे का तुला ..
बाबा तिची इच्छा आहे तर करू द्या ना...
पण मला आवडत नाही.
बाबा नोकरी लागली की लगेच लग्न करू हवे तर....बाबा तिच्या इच्छेखातर करू द्या....खूप मेहनत घेतली हो तिने. भूक नाही की तहान नाही असे करत अभ्यास केला. शिक्षण पूर्ण केलं आता नोकरीला लागली तर तुमचंच नाव मोठे होईल बाबा..
मला शिकवू नको मेधा !
बाबा मी शिकवत नाही हो.....ती कुठे पळून जातेय का ??? फक्त नोकरी करायचे बोलते आणि बाबा आधीचा जमाना होता की मुलींनी नोकरी करू नये, घर सांभाळावे...आता असे काही उरले नाही.
पण मी माझा निर्णय तुला सांगितला आहे मेधा....
तेवढ्यात समिधा आली आणि बाबाच्या पायाजवळ बसली
बाबा लहान तोंडी मोठा घास घेते पण मी एक बोलू ???
नोकरिसंदर्भात काहीही ऐकायचे नाही मला....
बाबा.....आजपर्यंत मी असे काही केले का ज्याने मी तुमचे नाव गमावले आहे. आजपर्यंत तुमचा निर्णय मी प्रमानच समजले आहे आणि आजही तुमचा निर्णय मी प्रमानच धरेल पण एकदा तरी बाबा फक्त माझ्यासाठी पुन्हा विचार करा...मान्य आहे नोकरी करण्याची आपल्याला गरज नाही, पण बाबा माझे शिक्षण मी असेच घालवू का ??? आणि उद्या जर मला नवऱ्याने सोडलेमी, तर मी कोणाच्या भरवश्यावर राहणार... तेव्हा माझे हेच शिक्षण मला कामात येईल बाबा..आणि नोकरी मला पैशासाठी नाही, तर शिकलेली विद्या दान करण्यासाठी करायची आहे. तुम्हीच म्हणता ना बाबा की, आपल्याजवळ असलेलं दान करायला हवं आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की मी नोकरी करू नये तर मी तुमच्या निर्णयाला प्रमाण ठरवेल... काहीही वावग करणार नाही बाबा...
तिने एका नजरेने वडिलांना बघितले तिच्या डोळ्यात आसवे तरंगले होते ती लगेच उठून आतल्या खोलीत गेली. वडिलांच्या डोळ्यातही पाणी आले. वडिलांनी विचार केला आणि जाता जाता समिधाला बोलले.
कोणत्या कॉलेजला नोकरी करणार आहेस ? ते कळव मला...
तिने वडिलांना घट्ट मिठी मारली.
बाबा आपला आशीर्वाद असाच कायम ठेवा....
नोकरी करायची म्हणतेस, जरा तब्बेतीची काळजी घे, लग्न करायचे आहे तुझे.....
हो बाबा.....धन्यवाद
तिचे वडील निघून गेले तोच समिधा अनुजा कडे गेली, अनुजाने दरवाजा उघडताच ती अनुजाला न बोलता सरळ वैभवच्या रूम मध्ये गेली. वैभव आरशात बघत होता ती लगेच त्याच्या जवळ गेली. वैभव बाबांनी नोकरीसाठी परवानगी दिली....
काय बोलतेस समु...
हो ना खरंच.. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय.
तिच्या डोळ्यात पाणी आले. ती हमसून हमसून रडू लागली. पहिल्यांदा त्याने तिला एवढे रडू दिले आणि म्हणाला,
यानंतर तू फक्त एकदाच रडशील.
ती विचारात पडली. यावर पुन्हा तो बोलला,
आज रडली ते आनंदाश्रू आणि शेवटचं रडशील ते लग्नात... यानंतर तुझ्या डोळ्यात आसवे येणारच नाही आणि आले तर ते फक्त आनंदाचे असतील.....
तिने डोळे पुसले व सरळ निघून गेली. अनुजा वैभव जवळ आली व म्हणाली,
वैभव, तुझ्या मनातलं तेव्हा सांगणार आहेस,
ताई आता वेळ आली आहे.... लवकरच सांगणार
तिने त्याच्या पाठीवर हात ठेवला व म्हणाली,
तिचे उत्तर काहीही असो पण तू खचू नकोस बाळा.... तुला जशी तिची गरज आहे तशी आम्हाला तुझी....
आणि ती तेथून निघून गेली....
- तेजस्विनी प्र. राऊत
साथ ( भाग बारा )
समिधाचे कॉलेजला जॉईन होऊन बरेच दिवस झाले. समिधा मस्त रुळली होती. वैभव त्याच्या मनातले समिधाला सांगण्याची संधी शोधत होता. आणि एक दिवस उजाडला तो म्हणजे वैभव चा वाढदिवस...समिधा ला काही ठाऊक नव्हते अनुजा आली व म्हणाली,
अग मेधा आणि समिधा आज ना वैभवचा वाढदिवस आहे.....
त्यावर समिधा उत्तरली,
तो तर काहीच बोलला नाही मला...
अजून बसत म्हणाली,
अग तो कसा सांगेल.. आपण काय करायला हवे सुचव ना समिधा...
समिधा आठवल्यासारखे करत म्हणाली,
सगळं माझ्यावर सोड ताई.. फक्त तो बाहेर जायला हवा मग मी सगळी तयारी करेल...
पण तो काम सोडून कुठेही जाणार नाही.
देवदर्शनाला तरी जाऊच शकतो, सहज त्याचे दोन तीन तास जायला हवे.
अनुजा उठत म्हणाली,
हो हे होऊ शकतं. मी त्याला पाठवेल लगेच.
समिधा थांबवत म्हणाली,
लगेच नको अगदी, सावकाश जाऊ दे... त्याने सायंकाळी सरप्राईज देऊयात.....
अनुजा आणि मेधा दोघींनाही ते मानवले. ती घरी गेली तोवर मेधा आणि समिधा दोघीनीही आपली कामे भराभर उरकली, समिधा ने आज कॉलेजला मेल करून सुट्टी घेतली. कामे उरकल्यावर समिधा खाली गेली. वैभव अजून घरीच होता...
हे काय वैभव तू अजून गेलाच नाही...
वैभव हातातला लॅपी खाली ठेवत म्हणाला,
का मी कुठे जाणार होतो का ???
ती एकदम चल-बिचल करत म्हणाली,
नाही रे तसे नाही, म्हणजे अनुजा ताई बोलत होत्या की तू मंदिरात जाणार आहेस....
तो उभा होत अनुजा कडे बघत म्हणाला,
मला नव्हते माहीत, हो ग ताई मी जाणार होतो का???
अनुजा त्याला म्हणाली,
जावंच लागणार, निदान एकतरी मंदिरात जाऊन ये ना....
तो समिधा कडे बघत म्हणाला,
मी जाईल पण मला कम्पनी द्यायला कोण येणार आहे का ???
अनुजा बोलली,
मला काम आहेत.
समिधा म्हणाली,
मला कॉलेज ला जायचे आहे सॉरी....
वैभव खाली बसत म्हणाला,
मग मी पण नाही जाणार.
समिधा लगेच म्हणाली,
अरे कसे काय करतो, जीजू बरोबर बर जा....
जीजू लगेच मान वर करत म्हणाले,
मला नाही ना जमणार... मी लेक्चरची तयारी करतोय....
समिधा जीजू ला म्हणाली,
जीजू प्लिज जा ना नाहीतर हा जाणार नाही...
जीजू उठत म्हणाले,
हे बर आहे तुमचे.... एरवी मला तुमच्यात घेत नाहीत आणि आता काम पडले तर मी हवाय ना... मी जात नाही...
त्यावर अनुजा त्यांना डोळे मोठे करत म्हणाली,
अस काय करताय आज वैभवचा वाढदिवस आहे ना.. त्याने नको का जायला आणि तुमची पण हवापालट होईल तोवर आम्ही सगळं आवरून घेतो....
जिजुच्या लगेच लक्षात आले ते म्हणाले,
बर बर चला जाऊया सालेसाहेब...
दोघेही बाहेर जाताच समिधा आणि अनुजा सगळ्या तयारीला लागल्या. अनुजा तिला छोटी मोठी मदत करत होती. तोच काम करता करता समिधा म्हणाली,
किती प्रश्न करतो ना वैभव ?
अग लहानपणापासून तो असाच आहे पण एक सांगू समिधा तो स्वभावाने खूप मोकळा आहे...
हो ताई ते दिसतच...
मेहनती खूप आहे...
हम्मम्म...
असेच गप्पा करत दोघींची तयारी झाली आणि जीजू वैभव आले. वैभव नी दार उघडले सगळीकडे अंधार दिसत होता त्याने लगेच लाईट लावला तोच सगळी तयारी बघून तो खूप आनंदला..
ताई ही सगळी तयारी समिधा....
ये शहाण्या, मी पण होते कळलं...
हो ताई, Thank You So Much....
समिधा केक घेऊन आली, समिधा ने निंबु रंगांची साडी घातली होती आणि त्या साडीत खूप गोड दिसत होती. वैभवचा वाढदिवस मजेत साजरा झाला समिधा घरी आली. वैभवनी मॅसेज टाकला...
थोडा वेळ गच्चीवर ये.... थोडं बोलायच आहे...
-तेजस्विनी प्र. राऊत
साथ ( भाग अंतिम )
समिधा आधी पोहचली होती ती फिरत गुणगुणत होती....
दो दिलं मिल रहे है,
मगर चुपके चुपके.......
लगेच मागून वैभव आला.....
ये दिलं तुम बिन कही लगता नही,
हम क्या करे......
दोघेही एकमेकांकडे पाहत हसले... जणू आज पहिल्यांदा भेटताय या स्वरूपाची त्यांची हास्ये होती..त्याचे ऑफिस वर्क, तिचे कॉलेज याविषयी बराच वेळ त्यांचे बोलणे चालू होते. नंतर समिधा ने आपल्या हातातील गिफ्ट त्याला दिले त्याने उघडून बघितले. त्यामध्ये एक गणपतीची मूर्ती होती आणि दुसरी घड्याळ होती दोन्ही गिफ्ट त्याला आवडले. तिने त्याच्या हाताकडे बघत म्हटले,
वैभव ही घड्याळ तुला योग्य वेळ सुचवेल आणि हे बाप्पा तुला योग्य मार्ग..
तो मंद हसला....
ती पुन्हा म्हणाली,
तुला आवडले ना.....
सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे समु...नेहमी सोबत राहील....
काही तरी आठवत समिधा म्हणाली,
अरे तू काहीतरी सांगणार होतास ना मला...
हो समु, आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे....
बोल ना मग.
समु ... आयुष्यात बरेच लोक येत असतात, त्यातील काही लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून मनात राहतात त्यापैकी तू आहेस, तुला पाहताक्षणी वाटले की ही आपल्या जीवनात खूप बदल करणार आहे, तुझ्याशी मैत्री करावी हे मन आणि डोकं दोन्ही सांगत होते.
ती त्याच्याकडे लक्ष देऊन बघत होती....तो पुढे बोलला,
आणि तुझ्याशी घट्ट मैत्री झाली. वाटलं नव्हतं की तू अशी साथ देशील, पण समु मला तुझी मैत्री कुठेतरी कमी पडत आहे.
ती डोळे रोखून त्याच्याकडे बघत होती. तो बोलला,
मला तुझी मैत्री कायम हवी पण त्यासोबत मला तू माझ्या सोबत हवी ...
ती न कळल्यासारखे त्याच्याकडे नुसती बघत होती, तो गुडघ्यावर बसला व तिला म्हणाला,
माझ्याशी लग्न करशील समिधा...???
ती एकदम शॉक झाली, तिने त्याला हात धरून उठवले, तो पुढे बोलला,
तू बायको जरी झाली तरी आधी तू माझी मैत्रिण असणार आहे, तुझ्याबाबतचा कोणताही निर्णय मी आधी मैत्रिण म्हणून बघेन नंतर बायको म्हणून.....कारण मला बायकोत मैत्री नको तर मैत्रीत बायको हवीय.... आणि तू काही क्षणाची बायको आणि आयुष्यभराची मैत्रीण असशील......
समिधा काहीच बोलत नाही हे बघून तो बोलला,
मला तुझ्या उत्तराची काही घाई नाही आणि हो मला ज्या भावना आहेत तुझ्याविषयी त्या तुला असतील असे अजिबात गृहीत धरून नाही.... तुझा निर्णय काहीही असेल तरी आपली मैत्री कायम राहील समिधा......
समिधाला काही सूचेना काय बोलावे...ती त्याला म्हणाली,
आत्ता या क्षणी मला काहीही बोलावले जात नाही आहे वैभव....
आणि तीच्या डोळ्यात अश्रू आले, वैभव तिला बोलला,
काहीही बोलु नको समिधा, नंतर बोलूया....
ती म्हणाली,
वैभव तुला माझ्या आयुष्यातील कडवे सत्य ठाऊक नाही.....
मला मान्य आहे समिधा,
न ऐकता कोणतंही वचन देऊ नको वैभव
प्रेम केलंय तुझ्यावर मी.....
वैभव मी तुझी बायको तर होईल पण...
पण जे ही असेल ते मला मान्य आहे,
तू बाबा होऊ शकणार नाही.
असे बोलून तिचा अश्रूचा बांध फुटला...
तो एकदम चक्रावला....
स्वतःला सावरून म्हणाला,
मला कळले नाही समिधा,
मी आई होऊ शकणार नाही.... माझ्या गर्भपिशवीवर गाठ आहे आणि डॉक्टर बोलले की मी आई होऊ शकणार नाही..... आणि कदाचित झाली तर तर तो फक्त दैवी चमत्कारच असेल....
त्याने तिला बसवत म्हटले,
समिधा जोडीदार महत्वाचा ग... मुलाचे काय ते आपल्याला दत्तक घेता येईल....मुलं दत्तक घेतले म्हणून तू त्याच्या वर प्रेम कमी करणार आहेस का???
पण वैभव, मी तुझ्यासोबत असे होऊ देणार नाही...तू मला विसरून जा पुढचं आयुष्य सुखात घालावं....
तू नाही तिथे सुख कसे ग ?
ती तेथून जात म्हणाली,
मला एक वेळ पण नको थांबऊ वैभव नाहीतर मी कधीच तुला सोडणार नाही....
ती जाणार तोच त्याने तिचा हात धरला,
समिधा मला सोडू नको नाही तर मला काही अर्थच उरणार नाही ग......
तिने हात सोडवला आणि रडत म्हणाली,
नको वैभव.....प्लिज.
त्याला तिच्या रडण्याचा अर्थ समजला त्याने लगेच तिचा हात ओढत तिला त्याच्या बाहुपाशात घेतले.......तोही रडावला आणि म्हणाला,
आता बोल, लगेच सोडून जाईल....
तिने मिठी अजून घट्ट केली व उत्तरली,
आय लव यु सो मच वैभव...
लव यु टू बायको....
त्यांच्या मागून अनुजा आणि मेधा दोघीजणी आपापल्या नवऱ्याबरोबर बघत होत्या.... त्यांच्याही डोळ्यात अश्रू दाटले होते......त्यांचे हे अनोखे मिलन सारा आसमंत बघत होता.... आणि पाऊसरूपी फुलांचा वर्षाव दोघांवर होत होता....
वैभव ने नेहमीप्रमाणे केसातून हात फिरवला व म्हणाला,
देवा तुझे खूप आभार....बायको नाही तर माझा जीव दिल्याबद्दल......
( ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे ..कशी वाटली ते नक्की प्रतिक्रिया द्वारे कळवा धन्यवाद )
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
-एडिटेड : विनोद (एक-इंसान)
आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे (मराठी लेख व कथा) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. एक चिट्ठी...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण
कथा मांडणी छान !
ReplyDeleteअभिनंदन तेजस्विनी आणि विनोद.
तुमचं प्रेम या विषयावरील कथालेखन उत्तम आहे,पण जर इतर विषय ही इतक्याच प्रेरक पणे मांडता आले तर वाचायला नक्कीच आवडेल.
Mind-blowing composition...
ReplyDeleteI got goosebumps while reading it...
Keep writing nd all the best both of u Vinod nd Teju