मागील भाग > भाग एक वरून...
भाग दोन -
आज शौर्याचे लग्न होते, आनंदाचा क्षण होता.घरात घाई गडबड सुरू झाली. सकाळचे सहा वाजले होते आणि तिला आकाश च्या फोन ने जाग आली,...
गुड मॉर्निंग प्रिन्सेस.....
व्हेरी गुड मॉर्निंग आकाश....
झाली तयार...
तुझ्या फोन ने जाग आली, रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले.
तुझी झोप मोड केली का मी???
अरे नाही उलट उठवून बरे केलेस नसता मला सगळे आवरायला वेळ झाला असता...
बर तू हो फ्रेश, मॅडम लग्नात बोलवालं ना मला......
आकाश मस्करी च्या मूड मध्ये म्हणाला
तिनेही त्याला मस्करी ने प्रतिसाद दिला,
बघू मूड झाला तर बोलवेन.....
दोघांनही फोन ठेवले व तयारीला लागले..... लग्नघटिका जवळ आली,दोघेही मांडवात बसले, चंद्र तारे ही लाजेल असे दोघेही दिसत होते. लक्ष्मीनारायण चा जोडा दिसतो असा मांडवात नाद ऐकू येत होता. शेवटी पुष्पहार त्यांच्या हातात दिले. शौर्या चे डोळे कधी नव्हे ते पाण्याने भरले होते. हा क्षण आकाश च्या नजरेतून काही सुटला नाही त्याने नकळत तिच्या हाताला स्पर्श करत आधाराचा धीर दिला. तिलाही तो स्पर्श आधारच वाटला. विवाह संपन्न झाला. शौर्या ची निघायची वेळ झाली. ती वडिलांच्या नमस्कार करायला घरात गेली . दोघांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. जाता जाता वडील तिला एकच वाक्य बोलले.
शौर्या, तुझं कर्तव्य जितके महत्वाचे तितकीच ही नवीन जबाबदारी सुद्धा महत्वाची....ओढाताण होईल, तानेलच थोडं पण त्याला तुटू देऊ नकोस पोरी...... कर्तव्य आणि घर दोन्ही सांभाळ.....
दोघांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.
शौर्या आईजवळ गेली, आई म्हणाली,
शौर्या, आजपर्यंत तू कर्तव्य जपलं, पण आता घराला अधिक महत्व दे,संबंध एकदा बिघडले की ते पूर्वरत होण्यास भयंकर कस लागतो.त्यामुळे नाते जप, माणसे जप......
शौर्या आईच्या कुशीत ओक्साबोक्शी रडू लागली.
निघायची वेळ झाली. सगळ्यांनी निरोप दिला. आणि शौर्या गाडीत बसली.आकाश तिला आधार देत होता......आणि म्हणूनच ती अधिक खंबीर जाणवत होती. गाडी सुसाट धावत कधी आकाश च्या दारात पोहचली कळले देखील नाही. नव्या सुनेचे स्वागत अत्यंत उत्साहात होत होते. शौर्या सुद्धा प्रत्येक क्षण टिपून घेत होती. इतर वेळी ऑफिस मध्ये वेळ जात असल्याने कोणतेही कार्यक्रम ती पूर्ण करू शकत नव्हती. म्हणून हे सगळे तिला नवीन आणि आनंदी वाटत होते. दुसऱ्या दिवशी सगळी पूजा झाली, देवदर्शन झाले. गप्पा, हसी मजाक करत दिवस भराभर उलथले.खेळीमेळीच्या वातावरणात लग्नाचे पाच दिवस कधी निवळले कळले देखील नाही. आज त्यांची मधुचंद्राची रात्र होती. परंतु शौर्या चा मासिक धर्म आल्याने ते अजून पुढे लोटले गेले. दोघांचे बोलणे होत नव्हते. बोलायला एकांत मिळत नव्हता. अशातच शौर्यावर कामाचे लोड होते.... शेवटी दोघांनी एकाच घरात राहून देखील फोन केला...
हॅलो,
सॉरी आकाश, माझ्यामुळे...
अरे छोटू, काही होत नाही, त्यात तुझी काय चुकी....
पण मला अपराधी वाटतय, आधीच सुट्ट्या कमी त्यात हे......
चालायचंच अग.... एवढे नको मनाला लावून घेऊ....
अजून एक बोलायचंय म्हणून खरं तर फोन केलेला,....
हा बोल ना....
आकाश आधीच एक केस आपल्या लग्नामुळे अडकली आहे. आणि ती माझ्याशिवाय सुटणे नाही....
अरे बापरे, मग आता......
मी सुट्ट्या कॅन्सल करून ऑफिस जॉईन करायचा विचार करते आहे... म्हणजे हे पाच दिवस घरी राहून काय करणार, त्यापेक्षा ह्या सुट्ट्या मला पुन्हा घेता येईल, काय म्हणतो..?
अग पण लग्नाला केवळ पाच दिवस झाले आणि लगेच जॉईन करण्याचा विचार...
मला माहित आहे खूप घाई होतेय पण केस सुटणार नाही तर मला घरून तरी काम करावेच लागणार त्यापेक्षा मी ह्या सुट्ट्या परत घेऊ शकते अरे...
बरोबर आहे तुझं ही मी बोलतो आईशी.....मी ही जॉईन करतो ऑफिस, सोबत सुट्ट्या घेऊया नंतर....
हो चालेल तसेही, एकदा बोलून बघ ना आईला.....आणि आकाश,...
बोल ना..
थँक्स...... आणि सॉरी देखील....
अरे शौर्या.... चालायचंच एवढं... आणि लग्न होऊन 5 दिवसच झाले अजून पूर्ण लाईफ बाकी आहे....
-लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
Interesting...... Kirti mam
ReplyDelete