Skip to main content

झुंज.....

नीताची नववी झाली होती. दहावीचे वर्ष म्हणून ती विशेष लक्ष देत होती. पण म्हणतात ना, दुधात एक लिंबाचा थेंबही दूध नासण्यास समर्थ आहे. तिचा घरात संकटाचे वारे वाहू लागले. आणि त्या वाऱ्याचा तिच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. घरची परिस्थिती बेताची, त्यात खाणारी तोंडे भरपूर, त्यामुळे शिक्षण फार क्षुल्लक वाटू लागले.घरच्यांनी यापुढे शिकायचे नाही. दोन पैसे आणायला मदत करायची असे सांगून हातातील पुस्तक घेत विळा दिला. शाळेत जाऊन टी सी ची मागणी केली. शिक्षकाने तिला प्रेमाने विचारले, बाळ, तू हुशार मुलगी, मग असे शाळा सोडण्याचा निर्णय का ???? सर, मलाही शाळा सोडायची इच्छा नाही असे म्हणत तिने घरची सगळी कहाणी सांगितली. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी चर्चा करत तिच्या घरच्यांशी बोलायचे ठरवले. नमस्कार,मी नीताच्या शाळेतील शिक्षक. माझं नाव, रमेश पाटील मी नीताचा वर्गशिक्षक, अस होय, या की मास्तर, बसा, आव ये रुखमे, मास्तरासनी प्याया पाणी आन की... रुखमा डोक्यावरचा पदर सावरत पाणी घेऊन आली, पाणी दिले आणि मास्तराच्या तोंडाकडे एकटक पाहू लागली. अव ये रुखमे, अशी अधाशागत काय पायलीस, जा, चा टाक की, नको नको, मला काही नको मी आपल्याल...

सरप्राईज... (भाग एक)

भाग एक -

शौर्या ची आज हळद होती. निदान आज तरी होणाऱ्या नवऱ्याला निवांत फोनवर बोलता येईल म्हणून आनंदात होती. पण कसले काय, हळदीच्या दिवशी तिला ऑफिस मध्ये जावं लागलं. सगळे पाहुणे घरात आणि नवरी काय तर ऑफिस मध्ये गेली होती. तिने कामाला आधी महत्व द्यायचे ठरवले होते. शौर्या पेशाने पी एस आय होती. त्यामुळे आज तिला अचानक जावे लागले, आई चाही पारा चढला होता. हळदीच्या दिवशी कोणी काम करतात का??? म्हणून आई चिडत होती.... शौर्याचे लग्न ठरून जेमतेम एक महिना सुद्धा झाला नव्हता. दोघांच्या सुट्या आणि वेळ कसा मिळेल त्या अनुषंगाने लग्नाची तारीख ठरवली होती. लग्न जुळण्यापासून दोघांचा वेळ काही मिळत नव्हता. कधी  शौर्या कामात तर कधी आकाश कामात असायचा. आकाश हा शौर्याचा होणारा नवरा होता. त्यामुळे दोघांना पाहिजे तसा वेळ आणि समजून घेणे जमले नव्हते. ही घरी येताच हळद लागली. आकाश चे फोन वर फोन येत होते. म्हणजे तसे शौर्या ने वचन दिले होते की आज ती त्याला बोलायला पूर्ण वेळ देईल. हळद उरकून ती आली आणि आकाश ला फोन लावला. 

हॅलो ,

काय अग, किती वेळचा फोन लावतोय. उचलत का नाही.

Sorry मला अचानक ऑफिस मध्ये जावे लागले...

आज ही...?

हो ना ,ईमर्जन्सी होती.

काही हरकत नाही. काम आधी महत्वाचे....

ऐक ना आकाश, मला ऑफिस मधून फोन येतोय, तुला करू का कॉल नंतर...?

ठीक आहे बोल तिकडे, झाले की कर कॉल......

शौर्या ने ऑफिस चा फोन घेतला. बराच वेळ ऑफिस चा फोन चालला तो ठेवला आणि परत आकाश ला फोन केला.....

हॅलो.....सॉरी आकाश, एक केस अडकली आहे. खर तर तिथे मी पूर्ण दिवस राहायला हवे होते परंतु हळदेमुळे मला यावं लागलं त्यामुळे फोन वर काम करते आहे.

तिकडून आकाश चा आवाज आला,

समजू शकतो अग..... पण तू स्ट्रेस घेऊ नये असं वाटतंय, कारण उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्या दिवशी तू थकलेली नसविस असे वाटतेय....

ती मंद स्मित देत म्हणाली,

अगदीच, उद्याचा दिवस अविस्मरणीय असेल आपल्यासाठी.......

काही प्लांनिंग करायला सुद्धा वेळ मिळाला नाही आपल्याला........

हो ना.....आकाश घरचे काही बोललेत का रे ?...

का ग...

नाही म्हणजे मी कपडे घ्यायच्या दिवशी शुद्धा मधूनच वापस आले....

थोडे वेगळे वाटले होते त्यांना, पण मी समजावून सांगितले त्यामुळे आता ठीक आहे ते सगळे......

आकाश मला खरच माफ कर, मी घरचे आणि कर्तव्य बघत बघत तुला कुठेतरी प्रायव्हसी द्यायला मागे पडत आहे.....

अग ये वेडा बाई,तू माझ्या घरच्यांचे मन सांभाळून घेत आहे तेच खूप मोठे आहे माझ्यासाठी.....

पण तू होणारा नवरा आहेस, आणि गेला 1 महिना मी तुला भेटने तर दूरच पण फोन वर देखील वेळ देऊ शकले नाही....

अग कर्तव्य महत्वाचे, आणि लग्नानंतर 

सोबत च राहायचे आहे आपल्याला......

त्यांचे बोलणे चालू होते तोच घरचे हळद लावायला गडबड करू लागले.....काही बोलू द्यायच्या आधीच तिच्या हातचा फोन घेतला व कट करून टाकला.

                     -लेखिकाज : तेजस्विनी प्र. राऊत.

पुढील भाग > भाग दोन...👍

Comments

  1. तेजस्विनी तुमच्यात एक चांगली लेखिका आहे l.पुढील लेखन वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरप्राईज...(भाग दोन)

                                                                                              मागील भाग >  भाग एक वरून... भाग दोन - आज शौर्याचे लग्न होते, आनंदाचा क्षण होता.घरात घाई गडबड सुरू झाली. सकाळचे सहा वाजले होते आणि तिला आकाश च्या फोन ने जाग आली,... गुड मॉर्निंग प्रिन्सेस..... व्हेरी गुड मॉर्निंग आकाश.... झाली तयार... तुझ्या फोन ने जाग आली, रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले.  तुझी झोप मोड केली का मी??? अरे नाही उलट उठवून बरे केलेस नसता मला सगळे आवरायला वेळ झाला असता... बर तू हो फ्रेश,  मॅडम लग्नात बोलवालं ना मला...... आकाश मस्करी च्या मूड मध्ये म्हणाला तिनेही त्याला मस्करी ने प्रतिसाद दिला, बघू मूड झाला तर बोलवेन..... दोघांनही फोन ठेवले व तयारीला लागले..... लग्नघटिका जवळ आली,दोघेही मांडवात बसले, चंद्र तारे ही लाजेल असे दोघेह...

एक चिट्ठी... ( भाग अंतिम )

                             (  भाग एक < येथे वाचा )                                                                                                     भाग पाच वरून... भाग अंतिम.... एवढेच चिठ्ठी त त्याने लिहले.गायत्री ती चिठ्ठी वाचतच उठली आणि तिने अमित ला घट्ट मिठी मारली. आणि दोघेही अश्रूला वाट करून देत होते.  अमित तुला माहीत असूनही का तू काल माझ्या जवळ आलास. का तुझं आयुष्य बरबाद केलंस अमित....मला एड्स कसा झाला ते माझ्यासाठी महत्वाचे नाही पण तुला माझ्यामुळे एड्स नको व्हायला.... एका रात्रीत तुझं आयुष्य का वाया घातलं  मला थांबूउ शकला असतास तू अमित.... अमित तीच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला, मल...