भाग एक -
शौर्या ची आज हळद होती. निदान आज तरी होणाऱ्या नवऱ्याला निवांत फोनवर बोलता येईल म्हणून आनंदात होती. पण कसले काय, हळदीच्या दिवशी तिला ऑफिस मध्ये जावं लागलं. सगळे पाहुणे घरात आणि नवरी काय तर ऑफिस मध्ये गेली होती. तिने कामाला आधी महत्व द्यायचे ठरवले होते. शौर्या पेशाने पी एस आय होती. त्यामुळे आज तिला अचानक जावे लागले, आई चाही पारा चढला होता. हळदीच्या दिवशी कोणी काम करतात का??? म्हणून आई चिडत होती.... शौर्याचे लग्न ठरून जेमतेम एक महिना सुद्धा झाला नव्हता. दोघांच्या सुट्या आणि वेळ कसा मिळेल त्या अनुषंगाने लग्नाची तारीख ठरवली होती. लग्न जुळण्यापासून दोघांचा वेळ काही मिळत नव्हता. कधी शौर्या कामात तर कधी आकाश कामात असायचा. आकाश हा शौर्याचा होणारा नवरा होता. त्यामुळे दोघांना पाहिजे तसा वेळ आणि समजून घेणे जमले नव्हते. ही घरी येताच हळद लागली. आकाश चे फोन वर फोन येत होते. म्हणजे तसे शौर्या ने वचन दिले होते की आज ती त्याला बोलायला पूर्ण वेळ देईल. हळद उरकून ती आली आणि आकाश ला फोन लावला.
हॅलो ,
काय अग, किती वेळचा फोन लावतोय. उचलत का नाही.
Sorry मला अचानक ऑफिस मध्ये जावे लागले...
आज ही...?
हो ना ,ईमर्जन्सी होती.
काही हरकत नाही. काम आधी महत्वाचे....
ऐक ना आकाश, मला ऑफिस मधून फोन येतोय, तुला करू का कॉल नंतर...?
ठीक आहे बोल तिकडे, झाले की कर कॉल......
शौर्या ने ऑफिस चा फोन घेतला. बराच वेळ ऑफिस चा फोन चालला तो ठेवला आणि परत आकाश ला फोन केला.....
हॅलो.....सॉरी आकाश, एक केस अडकली आहे. खर तर तिथे मी पूर्ण दिवस राहायला हवे होते परंतु हळदेमुळे मला यावं लागलं त्यामुळे फोन वर काम करते आहे.
तिकडून आकाश चा आवाज आला,
समजू शकतो अग..... पण तू स्ट्रेस घेऊ नये असं वाटतंय, कारण उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्या दिवशी तू थकलेली नसविस असे वाटतेय....
ती मंद स्मित देत म्हणाली,
अगदीच, उद्याचा दिवस अविस्मरणीय असेल आपल्यासाठी.......
काही प्लांनिंग करायला सुद्धा वेळ मिळाला नाही आपल्याला........
हो ना.....आकाश घरचे काही बोललेत का रे ?...
का ग...
नाही म्हणजे मी कपडे घ्यायच्या दिवशी शुद्धा मधूनच वापस आले....
थोडे वेगळे वाटले होते त्यांना, पण मी समजावून सांगितले त्यामुळे आता ठीक आहे ते सगळे......
आकाश मला खरच माफ कर, मी घरचे आणि कर्तव्य बघत बघत तुला कुठेतरी प्रायव्हसी द्यायला मागे पडत आहे.....
अग ये वेडा बाई,तू माझ्या घरच्यांचे मन सांभाळून घेत आहे तेच खूप मोठे आहे माझ्यासाठी.....
पण तू होणारा नवरा आहेस, आणि गेला 1 महिना मी तुला भेटने तर दूरच पण फोन वर देखील वेळ देऊ शकले नाही....
अग कर्तव्य महत्वाचे, आणि लग्नानंतर
सोबत च राहायचे आहे आपल्याला......
त्यांचे बोलणे चालू होते तोच घरचे हळद लावायला गडबड करू लागले.....काही बोलू द्यायच्या आधीच तिच्या हातचा फोन घेतला व कट करून टाकला.
-लेखिकाज : तेजस्विनी प्र. राऊत.
पुढील भाग > भाग दोन...👍
तेजस्विनी तुमच्यात एक चांगली लेखिका आहे l.पुढील लेखन वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
ReplyDelete