भाग तीन -
आकाश ने त्याच्या घरच्यांना कसे बसे समजावले आणि शौर्याला ऑफिस मध्ये जायला परवानगी मिळाली. तिने आकाश चे आनंदी मनाने आभार मानले.... लग्नाला पाच- सहा दिवस न होत की दोघांनी ऑफिस सूरु केले. आकाश च्या वडिलांना त्यांची परिस्थिती समजत होती व आईला समजावून सांगणे जरा दोघांसाठी अवघड होते. अशावेळी सासरे खूप जमवून घ्यायचे. बघता बघता शौर्या च्या मासिक धर्माचे पाच दिवस सम्पले. आणि शौर्याची सासु शौर्याजवळ आली. शौर्या लॅपटॉप घेऊन कामात होती. तीचे लक्ष जाताच ती उठली.....
आई, तुम्ही .... या ना..
काय करतेस शौर्या..?
आई काम सुरू आहेत ऑफिस चे...
बर नंतर येऊ का बोलायला....
नाही आई, ते चालूच राहणार तुम्ही बोला ना.....
उद्या पूर्ण वेळ घरी राहशील का ?
आई, काही कार्यक्रम आहे का घरी..?
नाही ग... पण तुझ्या पाळीने जे लांबणीवर पडले ते बाकी आहे...
शौर्या काहीतरी आठवत म्हणाली,
पण आई...
आणि ती अचानक गप्प झाली, आई ही फार बोलल्या नाही. आई उठून गेल्या. शौर्या ला काही समजले नाही. तिने लगेच आकाश ला फोन केला. आकाश आणि शौर्या एका घरात राहत होते पण अजूनही एका रूम मध्ये आले नव्हते. त्यामुळे त्यांचे संभाषण फक्त फोन पुरते मर्यादित होते.
हॅलो, आकाश
बोला बाई....
काय करतोय..?
बसलोय बाबा जवळ...
मला जरा बोलायचे होते....
आकाश उठून बाजूला गेला आणि म्हणाला,
हा बोल आता...
आई आत्ता आपल्या रूम मध्ये आल्या होत्या....
बर, काय बोलली आई...
उद्या आपल्या पहिल्या रात्रीची तयारी करणार आहेत....
अरे वा...म्हणजे लग्नानंतर तब्बल दहा- बारा दिवसांनी बायको मला दिसणार....
आकाश आणि शौर्या दोघेही हसले आणि शौर्या म्हणाली,
आई येण्यापूर्वी मला ऑफिस मधून फोन आला होता...
काही अडचण आहे का..?
मी घरी आल्यावर एक नवीन केस आली आणि ती केस माझ्या नावाने सर नी फाईल केली आहे.....
म्हणजे उद्या दिवसभर राहणे जमणार नाही तुला घरी ....
अनफॉर्च्युनेटली.. ..उद्या ऑफिस ला जावंच लागणार आकाश....
ठीक आहे..... मी बोलतो घरी....
सॉरी आकाश, पण घरी लवकर येण्याचा नक्की प्रयत्न करेल.....
बर....नको काळजी करू बोलतो मी आईला...
नको... तू नको बोलूस, मीच बोलते आईला....
अग पण....
तू बोलणे नको खाऊ.... मीच बोलेन.....
तिने फोन ठेवला व लगेच सासुबाई च्या रूम मध्ये गेली....
आई येऊ का आत..?
अग ये ना.... ये ये.....
ती आईच्या शेजारी बसली, आई साडीला घडी मारत होत्या, तिने सुद्धा एक साडी घेतली आणि तिला घडी घालत घालत म्हणाली,
आई , उद्या घरी राहवेच लागेल का..?
म्हणजे पूर्वीपासून नियम चालत आलाय आपल्या घरी, की त्या दिवशी तिने फक्त आराम करावा म्हणून तू जाऊ नकोस म्हटले....
पण आई उद्या जरा नवीन केस आली त्यामुळे उद्या जावे लागेल.... पण आई लवकर घरी येईल.....
अग पण.....
आई प्लिज ना.....लवकर घरी येईल प्रॉमिस.....
ठीक आहे... पण तीन वाजेपर्यंत तू मला घरात हवीय.....
हो आई, नक्की.…. . थँक्स आई.....
ती आपल्या रूम मध्ये गेली आणि आकाश ला फोनवर बोलू लागली.....
आकाश, कुठे आहेस...
आजची रात्र विरहात जात आहे जानेमन.....
अरे वा... एकदम फिल्मी..
क्या करे मेरी जान... सबर बहोत हुआ...
वैसे तो रात बहोत हो गई हैं..... सोना हैं मुझे....
हां, सो जावो..... वैसे भी कल रात सोने कौन देने वाला हैं.....
गप बस..... चल झोपते मी.... बाय...
बाय..!
दोघेही स्वप्न बघत झोपी गेले.....
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
Comments
Post a Comment