भाग चार -
आता तिच्या लक्षात आले होते की मुग्धा नावाचे कॅफे आहे आणि तिथे हा चहा साठी बोलवतोय. सहा वाजायला 10 मिनीटे बाकी होती, ती लगेच गाडी काढून तिकडे गेली. कॅफेमध्ये पाऊल टाकताच एक गाणं वाजल...
आइये आप का ही इंतजार था......
ती आतमद्ये गेली आणि तेथील वेटर ने तिला वर जायला सांगितले.... पण वर जाताना पायऱ्यांच्या कठड्याला एक चिट्टी होती. तिने लगेच वाचायला घेतली.
गायत्री,.....
तुझ्या समोरच एक टेबल आहे, तिथे एक गिफ्ट ठेवलं आहे ते जरा उघडशील का ?
तीने लगेच उघडले. त्यात सुंदर मरून कलरचा वन पीस ठेवला होता आणि त्यावर एक चिट्ठी होती.... तिने वाचायला घेतली.
मला माहित आहे तुला मरुन रंग खुप आवडतो. तुझ्या साईडलाच एक रूम आहे, डोन्ट वरी रूम सेफ आहे तिकडे चेंज करू शकतेस तू.... अर्थात तुझी इच्छा असेल तरच.....गायत्री तो ड्रेस घेऊन रूम मध्ये गेली..रूम नीट बघून घेतली आणि तो ड्रेस घातला...
गायत्री.... खूप गोड दिसतेय....तुला लपून बघत नाही आहे ग पण मी आधीच बघितलं होत तुला मरुन रंग खूप छान दिसतो.....आता वर येऊ शकतेस....
गायत्री भराभर पायऱ्या चढून वर गेली तोच एक गाणं वाजल ...
तू ही ये मुझको बता दे, चाहू मै या ना....
ती हसू लागली... टेबल जवळ गेली आणि तिथे कृत्रिम गुलाबाचं फुल ठेवलं होतं आणि त्याखाली एक चिट्टी....
तिने लगेच उघडलं...
त्यात सुंदर अंगठी ठेवली होती...
आवडली ना....ही गुलाबाच्या फुलात राहून राहून कंटाळली आहे, ती गुलाब फुलपेक्षा तुझ्या बोटात खुलून दिसेल. पण माहिती आहे तू घालणार नाहीस..... तेव्हा जरा थांब मी आलोच......
आणि गाणं सुरू झालं..
तो समोर येणार म्हणून तिला धडधडू लागलं होतं. कोण असेल ? कसा असेल ? या विचारत असतानाच एकदम लाईट बंद झाले.....आणि एक फ्लॅश फक्त गायत्री वर होता..... माईक मधून आवाज येऊ लागला.
माझ्या हृदयात तुझ्याशिवाय दुसरे कोणी येऊ शकणार नाही.
तुला मी आयुष्यभर साथ द्यायला तयार आहे...
पण माझं हृदय जिच्यात अडकल तिला खबर आली असेलच.
आजीबात काही घाई नाही.. तुला वाटेल तेव्हा तुझे उत्तर कळव हो असेल तरी आणि नाही असेल तरीही....
आणि पुन्हा थांबून आवाज आला...
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ....
आणि दुसरा फ्लॅश ज्याची गायत्री वाट बघत होती त्याच्यावर पडला....तो गुडघ्यावर बघून हातात गुलाबाचं फुल घेऊन होता..... बराच वेळ दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले... नंतर लाईट लागले तेव्हा दोघे भानावर आले.....
तिने त्याच्याकडे हळूच बघितले.
Hi, मी अमित.... जो तुला चिठ्या लिहायचा तो मीच....
अमित दिसायला सुंदर होताच पण त्याही पेक्षा त्याचे डोळे खूप सुंदर होते...बोलके होते..... तो समोर बोलू लागला.
मी तुला मागील एक वर्षांपासून बघतो आहे. तुझ्या कॉलेजचे ट्रस्टी आहे ना त्यांचा मी मुलगा.... आठवत तू एक कम्प्लेन्ड घेऊन आली होतीस बाबाकडे तेव्हा एक जण समोर बसले होते. मी तेव्हा नेमकेच वॉशरूमला गेलो होतो.... मी निघायची आणि तू येण्याची एकच वेळ झाली....तेव्हा मी तुला दारातून बघत होतो आणि मला तू, तुझा स्वभाव, समजदार पणा खूप आवडला. आणि तेव्हापासून तुला बघतो आहे तुझ्या आवडी-निवडी समजून घेतो आहे.....
ती काही न बोलताच मंद हसली...
दोघांनी कॉफी पिली आणि गायत्री बोलू लागली.....
मी निघू.... उशीर झालाय.
तो सुद्धा म्हणाला,
होय, उशीर झाला निघ तू....
ती आपली बॅग घेत म्हणाली,
Thank You.....मला असले सरप्राईस आवडतात....
तो हसतच उठला ....
ती पायऱ्यापर्यंत गेली आणि मागे वळून म्हणाली,
मला ही तू आवडायला लागलायस....
आणि लगेच तिथून निघून गेली....
लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
पुढील भाग उद्या याच आमच्या ब्लॉग वर. आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे (मराठी लेख व कथा) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. हाक...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
Comments
Post a Comment