भाग तीन
डिअर गायत्री,
मला माहित आहे, तू हट्ट करशील येण्यासाठी. पण मला माहित आहे तुला दवाखान्याची फार भिती वाटते. आणि दवाखान्यात तू बेडवर मला असे झोपलेले बघु नये असं वाटते. आणि मी लवकरच बरा होणार आहे, म्हणून म्हणतोय नको येऊस आणि तुझ्या घरचे काळजी करत असतील तेव्हा जा घरी सोबतच माझा मोबाईल नंबर पाठवला आहे. वाटले तर कर फोन पण वाटलं तरच कर उगाच नंबर दिला म्हणून नको.... आणि हो माझा मित्र खोळम्बलाय त्याला निघू दे.... आणि आपण भेटू लवकरच....
तिने त्याला जाण्यासाठी सांगितले पण लगेच आठवत तीने त्याला थांबवले आणि तिने सुद्धा एका कागदावर "गेट वेल सून..." लिहले व त्याला दे म्हणून सांगितले.
पुन्हा त्याला आवाज देत म्हणाली,
त्याचे नाव काय..?
गायत्री तो सांगेलच तुला आता निघू मी.
होकारार्थी मान हलवत तिने त्याला परवानगी दिली. घरी गेली तेव्हा बाबांना मिठी न देताच निघून गेली बाबा आई एकमेकांकडे बघू लागले. आणि आई म्हणाली
काही तरी बिनसलेलं दिसतंय...
बाबा म्हनाले,
तू नको काही बोलूस तिला सांगेल ती आरामात.....
संध्याकाळी बाबा तिच्या रूम मध्ये गेले आणि तिला कुरवाळत म्हणू लागले.
गायत्री काही बिनसलाय का तुझं ?
तीने बाबाच्या मांडीवर डोकं ठेवले
आणि म्हणाली,
आई ग तू पण ये अशी दारामागून नको ऐकूस... ये जवळ बस.....
दोघेही जवळ येत म्हणाली,
मागील चार पाच दिवसापासून जे काही झालं ते सगळं तिने एका दमात सांगून टाकले.
बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाले,
म्हणजे तू त्याला बघितले सुद्धा नाही.
नाही ना बाबा म्हणून तर....
आणि तिने हातातली चिट्ठी बाबाला दिलीबी.
बाबा वाचून झाल्यावर म्हणाले,
अग यात मोबाईल नंबर दिलाय फोन करून बघ ना एकदा....
पण बाबा मला नको वाटतय फोन करायला.
अग बर नाही ना त्याला, मग तब्बेत विचारायची म्हणून तरी फोन करून बघ...
अस म्हणताय बाबा.....
आई जरा रागातच म्हणाली,
अग हे बघ आम्ही तुला कुठलीच रोकठिक करत नाही पण तो मुलगा योग्य आहे का ते बघ तेव्हाच मैत्री कर त्याच्याशी...
बाबा डोळे काढत म्हणाले,
अग थांब की जरा.... काही काय बोलतेस..
बाबा, नक्की करू न फोन ?
तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा म्हणाले,
कर रे बाळा ! आणि काय बोलला ते सांग आम्हाला...
आई कुरकुर करत म्हणाली,
इथेच बोल ना आमच्यासमोर
बाबा आईला उठवत म्हणाले,
तीच तिला बोलू दे, सांगेल ती नंतर... आता चल...
आई बाबा बाहेर जाताच तिने फोन केला..कितीतरी वेळा तर नुसती एक रिंग गेली की कट करायची.... त्यामुळे तिकडूनच रिटर्न फोन आला.....
गायत्री बोलली
हॅलो,
हा बोल गायत्री
गायत्री गोंधळून गेल्यासारखे त्याला म्हणाली,
तुला कसे कळले की मी गायत्रीच आहे म्हणून.
अग तू कितीदा एक रिंग देऊन फोन कट केलास... मला ओळखायला येत नाही असे वाटते का तुला...
नाही तसे पण....
पण काय गायत्री फ्री होऊन बोल.
ते सोड.....कसा आहेस तू ?
तुझा फोन आलाय आता होईल लगेच बरा...
दोघेही मंद हसले.
आता गायत्रीला सुचत नव्हते नेमक काय बोलावे तेव्हा ती म्हणाली,
Ok, लवकर बरा हो. ठेवते मी फोन...
एक गोष्ट बोलू गायत्री
हा बोल ना,
तू जेवढी सुंदर आहेस अगदी तूझा आवाजही गोड आहे.
तिने शेवटी फोन ठेवला आणी विचार करू लागली.
हा असा कसा आहे, एकदम समंजस वाटला बोलण्यावरून...हा माझ्या कॉलेजमध्ये असावा तेव्हाच एवढी सगळी माहिती आहे. पण असा समोर का येत नाही अन मला भेटायला ही येऊ दिले नाही. तिला त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. आणि या विचारातच ती झोपी गेली. असे दोन तीन दिवस गेले पण ना तिला चिठ्ठी आली होती ना त्याचा फोन आला होता आणि हिनेही स्वताहून त्याला फोन केलेला नव्हता.
आज गायत्री कॉलेजला गेली होती. नेहमीप्रमाणे आपल्या बेंच वर बसते तर काय तिला चिठ्ठी दिसली त्यात लिहले होते..
गायत्री मी त्या दिवशी येऊ शकलो नाही यासाठी माफ कर...आता मी बरा झालोय आणि एक क्लु अजून देतोय.
आणि दुपारचा आळस घालण्याचा मार्ग आहे
रस्त्यावर पडतं तुझ्या
पुढे जाणून घ्यायची उत्सुकता आहे
ReplyDeleteधन्यवाद धनश्रीजी आम्ही सर्व भाग पब्लिश केले पुढील भाग वाचून आपली या कथेवरील प्रतिक्रिया नक्की द्याल.
Delete