मागील भाग > भाग एक वरून....
भाग दोन -
यातही नाव लिहले नाही.... मरुदे मला काय मी नाही शोधत बसणार क्लु त्याचा....
गायत्री खुर्चीवरून उठत म्हणाली.
तोच प्रगती म्हणाली,
अग मी शोधला बघ दाते, पालक, छत्र, आई वडील नाही आणि काय बोलला तो अनाथ आश्रममध्ये जाणार आहे तो....
सापडला !!!
पुढचा क्लु आहे 'अनाथ आश्रम'.
गायत्री तिला ओढत म्हणाली,
तूच जा तिकडे, मी जाणार नाही कळलं.
अग ऐक तर नेमका कोण आहे ते तर बघूया...
दुसऱ्या दिवशी त्यांनी रस्त्यावर कोणते अनाथाश्रम पडते ते बघितले व तिघीही तिथे गेल्या.....
तिथे जाताच एक छोटासा मुलगा तिच्या जवळ आला आणि गुलाबच फुल देत म्हणाला...
हॅपी बर्थडे ताई...!
तिला त्याचा खूप हेवा वाटला.
Thank You So Much !!! किती गोड आहेस.. नाव काय रे तुझं ...
माझं नाव राघव आहे.
तिने त्याचा पापा घेतला.
तोच थोडं पुढे जात नाही तर अजून एक छोटी मुलगी चॉकलेट घेऊन आली,
ताई "Happy Birthday "...
तिने त्या चॉकलेटचा छोटा हिस्सा घेत बाकी चॉकलेट तिला परत केले व म्हणाली,
"Thank You Dear..."
पण तुम्हाला कसे माहिती माझा वाढदिवस आहे ते....
तिने गायत्रीचे बोट पकडत आतमध्ये नेले.
तिथे एक केक ठेवलेला होता आणि सगळे मुले केकच्या आजूबाजूला उभी होती. केकवर तिचा फोटो होता. हे सगळे तिला खूप इम्प्रेस करून गेले. ती तेथील मॅडम जवळ गेली व म्हणाली,
मॅडम कोणी अरेंज केलं हे, नाव काय त्यांचं ?
सॉरी मॅडम नाव सांगायला सांगितले नाही .
चला ना केक कापा, मुले वाट बघताय...
तिने त्यांच्या सोबत केक कापला. पण तिला आता मनस्ताप नाही, तर वेगळाच आनंद होत होता. जणू तीच स्वप्न कोणीतरी पूर्ण केलं असाव.ती निघू लागताच छोट्या मुलीने गिफ्ट दिले ते घेऊन त्या तिघी निघून गेल्या. काहीही असुदे पण त्या मुलात काहितरी विशेष आहे; असे प्रगती आणि सारिका गोष्टी करत होत्या.
घरी आल्यानंतर तिचा वाढदिवस घरी पण साजरा केला. झोपायला जाताच तिला ते गिफ्ट दिसले तिने उघडून बघितले.
त्यात तिच्या फोटो चा अलबम होता.तिच्या नकळत तिचे कॉलेजमध्ये फोटो घेतले होते आणि अगदी सुंदर आले होते. ते बघून झाल्यावर गायत्री स्वतःशीच म्हणाली,
'आजच सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे...'
त्यातील चिट्ठी तिने वाचली,
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तुला....गिफ्ट आवडलय ना ? सॉरी तुझ्या नकळत तुझे फोटो घेतले पण "आय प्रॉमिस" मी त्यातला एकही फोटो जवळ ठेवला नाही...एवढा विश्वास तर ठेऊच शकतेस.
भेटू उद्या ( क्लु )...
शांतता जिथे भरभरून असे
दाटी वाटी ही तशीच असते
माणसांची गर्दी तिथे
पण सोबत पुस्तकांची असते.....
नाव
( कळेलच लवकर )
ती विचार करू लागली आणि झोपेत तिला आठवले...
वाचनालय...!
दुसऱ्या दिवशी सकाळी ती कॉलेजमध्ये गेल्या गेल्या वाचनालयात गेली...पण एवढे मोठे वाचनालय कसे शोधू आता मी...?
ती विचार करत असतानाच तिच्या समोरच्या टेबल वर एक चिट्ठी दिसली ती लगेच तिथे गेली
त्यावर लिहले होते
शेवटी गर्दीतही एक कागदाचा तुकडा शोधलासच.....
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला तिने
प्रेमकहाणी होती सुंदर
शोधून बघ प्रेम पत्र
त्याच पुस्तकाच्या अंदर....
कॉपी त्याच्या 15 आहेत,
पण एकात ते दडले आहे.
शोधून बघ मिळेल तर,
ते तुझ्या जवळच आहे....
गायत्री हुषार होती, तिला लगेच लक्षात आले की ते पुस्तक ययाती आहे. पण जवळ आहे म्हणजे नक्की कुठे.....बऱ्याच वेळानंतर तिला समजले की ती जिथे उभी होती त्याच टेबलवर ययाती पुस्तक ठेवलेले होते.....अखेर तिला त्यात चिट्ठी सापडली.
अरे वा...!
किती हुशार आहेस गायत्री तू...शोधलं ना....आज खूप सुंदर दिसतेयस. अजून अंत नाही बघणार तुझा... आता एक शेवटचा क्लु देतो....
फुलांचा सडा तिथे
झाडांची गर्दी खूप
कधी असते साउली तिथे
पण कधी कडक धूप....
असतात तिथे खूप जण
पण गर्दीत मला शोधशील का
येऊन तिथे एकदाची
माझी मैत्रीण बनशील का???
गायत्री गालातल्या गालात हसू लागली. आणि सायंकाळी कॉलेजच्या गार्डनमध्ये जाऊया म्हणून क्लासमध्ये निघून गेली.
सायंकाळी ती गार्डन मध्ये गेली.... बराच वेळ झाला तरी ना तो आला होता ना ही त्याची चिट्ठी.... ती कंटाळून एका बेंचवर जाऊन बसली. तोच एक मुलगा धावत धावत तिच्याजवळ आला आणि म्हणाला,
मिस गायत्री तुम्हीच ना...?
ती उठत म्हणाली
होय मीच ! काय झाले...?
जो तुला चिठ्या पाठवतोय ना त्याचा अपघात झालाय....
ती जोरात ओरडली
काय ........???
हो इथे येता येता गाडी स्लिप झाली व पडला. तू वाट बघत असशील म्हणून मला त्याने तुझ्या कडे पाठवले आणि येऊ शकलो नाही यासाठी तुला सॉरी बोलायला सांगितलंय.....
आता कसा आहे तो...?
बरा आहे... थोडक्यात निभावले त्याचे..
मला पण यायचय हॉस्पिटलमध्ये...
अग त्याने नको येऊ म्हणून सांगितले. भेटेलच तो...
नाही नाही मला आत्ताच यायचं आहे !
तो बोललाच होता की तू हट्ट करणार म्हणून, त्याने चिट्ठी दिलीय ते वाच. मी निघतो...
एक मिनिटं,
तू जाऊ नकोस , मला वाचू दे..
-लेखिकाते : जस्विनी प्र. राऊत
पुढील भाग उद्या याच आमच्या ब्लॉग वर. आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे (मराठी लेख व कथा) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. हाक...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण
Comments
Post a Comment