भाग पाच -
आता दोघे मस्त बोलू लागली होती....दोघांच्या घरून परवानगी मिळाली होती. असेच दोघे बाहेर गेले असतानाच गायत्रीला चक्कर आली, त्याने लगेच दवाखान्यात नेले. गायत्री च्या टेस्ट करायला सांगितल्या. त्यामध्ये तिला एक आजार निघाला होता. अमित पुरता घाबरला.... त्याला काहीच सुचत नव्हते. त्याने गायत्रीची खूप काळजी घेतली..गायत्रीच्या आई बाबाला त्याने सांगितले. त्यांना अमितच्या घरच्यांनी सावरले. पण अमित पूर्ण तुटला होता....एक दिवस गायत्री त्याला विचारु लागली...
अमित,
बोल ग,
काय झालंय मला...?
अग तुला चक्कर येताय म्हणून आराम सांगितलंय... जेवत नाहीस ना तू म्हणून अस होतंय !
तो नजर खिडकीकडे करत बोलला त्याच्या डोळ्यात आसवे दाटले होते...
गायत्री लेटत म्हणाली,
बर.
अमित बाहेर जाऊन खूप रडला....
त्याची आई म्हणाली,
अमित कस होईल रे तुमचं....
तो आईला धरून ओक्साबोक्शी रडू लागला....
आई आयुष्यात एकाच मुलीवर प्रेम केलंय, पण तिची सुद्धा साथ नाही. डॉक्टर बोलत आहेत ती फक्त काही महिन्याची सोबती आहे....आई मी नाही राहू शकत ग तिच्याशिवाय....मला ती हवीय, आयुष्यभर.. आणि पुन्हा रडू लागला...
गायत्री बरी होऊन घरी आली आणि तिने अमित ला फोन केला.. अमित भेटू शकतोस....
अमित.
हा बोल ग गायु
I love you !
अमित पुरता शहारून गेला...त्याच्या डोळ्यात आसवे जमा झाली.
काय झालं अमित ?
काही नाही ग आणि तिला त्याने घट्ट मिठी मारली....
घरी गेला की अमित सारखा आईला बोलायचा...
आई ग कसे होईल माझे ? मी नाही राहू शकत तिच्याशिवाय आणि लहान मुलासारखा रडायचा. आईला त्याची अवस्था बघवली जात नसे.
गायत्रीची तब्बेत आणखीनच खालावत चालली होती... शेवटी त्याने निर्णय घेतला की आपण गायत्री शी लग्न करावं...गायत्रीचे आईबाबा आणि अमितचे आईबाबा अमितला समजावत होते, की तुझे आयुष्य नको वाया घालऊस... गायत्री काही दिवसांची सोबती आहे.
त्यावर अमित बोलला.
तेच काही दिवस ती माझी बायको म्हणून असावी असे मला वाटतेय.नाही म्हणू नका मला लग्न करायचं आहे. शेवटी लग्न झाले.. गायत्री थकल्यासारखी दिसत होती. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने त्याला एक प्रश्न विचारला....
अमित सोडून नाही ना रे जाशील...
अमितला एकदम रडू आले, पण त्याने सारवले आणि म्हणाला,
मी कुठे सोडून जातोय तुला सोडून तर .....
तर काय अमित ..?
अग अस पहिल्याच रात्री काही बोलत असतात का....
मग काय करतात अमित, म्हणत ती त्याच्या जवळ गेली.
तो दूर जात म्हणाला
अग, गप्पा करूया छान,
ती मिठी घेत म्हणाली,
आजच्या रात्री गप्पा नसतात करत...आणि काय माहिती अजून किती रात्र आपल्याजवळ असतील म्हणून आहे त्या रात्रीचा अनुभव घेऊया ना....
अग पण तुला बर नाही गायु....आणि काही घाई नाही आहे अग....
अरे पण मला एकरूप व्हायचं आहे अमित...
अमितच्या मनात विचार आला...सांगून टाकावे का हिला सगळंच..
पण त्या रात्री तो तिच्या जवळ गेलाच आणि मंद दिवा मालवला.....
दुसऱ्या दिवशी गायत्री खूप फ्रेश दिसत होती......।
गायत्री ने सगळ्यांना चहा केला आणि अमितच्या बाबाला चहा नेऊन देतानाच जोरात पडली..अमित अमितची आई आणि बाबा यांनी तिला दवाखान्यात नेले तर डॉक्टर अमितला बोलले.....
ही काही तासांची सोबती आहे, त्यामुळे तुम्ही तिच्याशी बोलून घ्या....
अमित जोरात रडत होता...त्याची आई बाबा दोघेही अमित आणि गायत्री ची अवस्था बघून रडत होते, गायत्री चे आई बाबा सुद्धा आले त्यांची ही अवस्था फार काही बरी नव्हती.....
अमित आतमध्ये गेला तोच गायत्री ने त्याच्या हाती एक चिठ्ठी दिली....
अमित वाचू लागला....
Dear अमित,
सगळं कसं चिट्ठीत लिहून द्यायचा ना.... मग मला काय झाले ते का नाही लिहून दिलेस.... अमित मला एक शेवटची चिठी देशील ??? मला काय झालंय तर सांग ना अरे.आणि अमित एक वचन दे माझ्या प्रत्येक वाढदिवशी ज्या अनाथ आश्रममध्ये तू माझा वाढदिवस केला तिथे जात जा.... मुलांना खाऊ देत जा... आणि आपण दोघांनी मिळून जे झाड लावलय ना तिथे एक चिठ्ठी ठेवत जा.... मी वाचायला येत जाईन.... दरवर्षी एक चिठ्ठी लिहून ठेवत जा अमित.... आणि खूप मोठा हो ..... मी तुझ्यासोबत आहे नेहमी.....
तुझीच बायको
गायत्री
अमित ने रडत रडत एक चिट्टी लिहली आणि ती गायत्री च्या हातात दिली....
माझ्या आयुष्यात येऊन गायत्रीची गायु झालीस.. एक वर्ष ही सोबत राहिली नाहीस तू माझ्या... खूप राग येतोय मला तुझा. तुला एइड्स झालाय गायु..... हे तू आजारी होतीस तेव्हा तुला रक्तातून झालाआहे. तुझे रक्त पूर्णपणे निकामी झाले आहे आणि तू काही तासांचीच सोबती आहेस......
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
Comments
Post a Comment