भाग चार -
सकाळीच उठून शौर्याने भराभर उरकले आणि स्वयंपाक घरात गेली. तिथे आई स्वयंपाकाची तयारी करतच होत्या ती त्यांच्या जवळ गेली व म्हणाली,
आई, आज स्वयंपाक मी बनवते..... काय काय बनवायचे.....
आज तू फक्त आराम करायचा.....
पण आई मी बनवेल.....म्हणजे येतं मला थोडं थोडं बनवायला....
अग आज नको..... ऑफिसला जायचे ना तुला.....
हो पण वेळ आहे आई....
जा बस आणि नाश्ता करून घे.....
आपण सोबत करूया ना आई.....
अग आम्ही नंतर करतो.....
बर आई मी बाबा आणि आकाश ला देते....
अग बाई, तू तुझेच आवर......
आई, थोडा वेळ आहे माझ्याकडे......
हट्टी आहेस..... जा दे आणि तू ही बस त्यांच्याबरोबर.
तिने प्लॅट डायनिंग टेबल वर नेऊन ठेवल्या आणि बाबाच्या रूम मध्ये गेली. बाबा पेपर चाळत बसले होते तीने हाक मारली....
बाबा, नाश्ता करताय ना....
तू कर.... मी आलोच....
ती बाबा जवळ गेली. त्यांच्या हातातील न्यूज पेपर काढून घेत म्हणाली......
बाबा, तुम्ही नाही तर मीही नाश्ता करणार नाही....
तिने हळूच आकाश कडे बघितले ... आकाश लॅपटॉप वर काहीतरी काम करत होता....
तू येतोयस ना नाश्ता करायला???
मला कोणी बोलावलेच नाही.....
नको येऊस.... हम तो चले... क्यू बाबा...
बाबांनी शौर्याचा हात हातात घेतला व म्हणाले,
चलो प्रिन्सेस...
तिने जाता जाता मागे वळून बघिलते व आकाश ला नजरेनेच खुणावले......
आकाश ही लॅपटॉप सोडून त्यांच्या मागे मागे आला....
तिघे नाश्ता करायला बसले....शौर्या बाबांना जबरदस्तीने वाढत होती तोच आकाशच्या प्लेटमध्ये नकळत वाढून देत होती. शौर्याने प्लेट बेसिनमध्ये नेऊन ठेवल्या आणि रूम मध्ये गेली. आपली गन कमरेला लावली, कॅप डोक्यात घातली आणि दंडा हातात घेतला. मोबाईल खिशात ठेवत आणि गाडीची चावी घेत आईला म्हणाली,
आई निघते आहे.....
आईने आतूनच आवाज दिला.....
गाडी हळू चालव, आणि हो लवकर ये.....
तिच्या पाठोपाठ आकाश सुद्धा निघाला,....
नवीन केस आली की शौर्या चा पार गोंधळ उडत असे. आणि बऱ्याच गोष्टीत शौर्या एक्सपर्ट असल्याने तिच्यावरच येऊन बसायच्या. काम सुरू असताना आकाशचा फोन आला... फाईलमध्ये डोकं खुपसतच तिने फोन उचलला,
हॅलो,
घरी कधी येणार आहेस...
अरे काय आकाश, आत्ताच तर आलो ना आपण घरून....
मॅडम एकदा घड्याळात बघा... दुपारचे दोन होताय....
तिने आपल्या हाताच्या घड्याळात बघितले आणि डोक्यावर हात ठेवत म्हणाली,
ओहहज शीट, किती लवकर वेळ गेला यार....
का, कामे आटोपली नाहीत का..?
अरे ही केस खूप गुंतागुंतीची आहे, आणि त्याला अडकलेल्या साखळ्या ही भरपूर.... समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे...
ठीक आहे, काम कर तू...
ऐकना, आईला...
सांगेल तुझे येणे होणार नाही ते....
आणि त्याने लगेच फोन ठेवला...शौर्या ला थोडे वाईट वाटले,लग्न होऊन 15 दिवस झाले , पण दोघांनी एकमेकांना निट बघितले सुद्धा नव्हते. एकांत तर खूप दूर आणि अशात आकाश चे चिडणे साहजिकच होते......तिने लगेच आईला फोन केला....
हॅलो आई
हा बोल बेटा,
आई मी शार्प तीन पर्यंत पोहचते घरी....
हो नक्की..... चल मी ठेवते फोन
शौर्या फोन ठेवून लगेच आपल्या सिनियर कडे गेली,
एक्सक्युझ मी सर..
एस मिस शौर्या...
सर मला घरी जायला लागेल ...
केस पूर्ण झाली..?
सर केस समजून घ्यायला वेळ लागतोय...
मग घरी जाण्याची घाई का करताय मिस शौर्या....
सर, केस समजून घेणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे सध्या माझे घर पण आहे...
पण घरासाठी तुम्ही कामाकडे दुर्लक्ष नका करू....पूर्वीच्या शौर्या वेळोवेळी हजर असणाऱ्या आणि कामाला तत्पर असण्याऱ्या होत्या आणि त्याच यापुढे अपेक्षित आहेत..
नक्कीच सर.... कर्तव्य आधी....आणि मी आज केसचा संबंध जुळवून आनेलच...
ठीक आहे... वेलडन !!!
थँक्स सर.
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
Comments
Post a Comment