भाग चार वरून...
भाग पाच -
शौर्या ने पटापट फाईल आपल्या बॅग मद्ये घेतल्या आणि सुसाट वेगाने घरी पोहचली.... घरात येताच तिने किल्ली भिंतीला लावली आणि घड्याळाकडे बघीतले.... काटा 5 वर जाऊन पोहचला होता... तिला वाटले आता आपले काही खरे नाही, दोन तासाने लेट पोहचले, ती रूम मध्ये गेली. तिने हात पाय धुतले, आणि बाहेर येताच आई रूममध्ये आल्या.
आई, सॉरी..... खूप प्रयत्न केला पण दिलेल्या वेळेत पोहचता नाही आले.....
अग मला माहित होते, नको काळजी करू.....
आईने आपल्या पुढील हात समोर केला....
ही घे साडी...घालावीच लागेल असे काही नाही.... पण सुनेला देण्याची प्रथा असते. तुला जो ड्रेस घालायचा तो घाल...आणि ये बाहेर...
शौर्या ने ती साडी घेतली, आणि तीच घातली सुद्धा... खाली जाताच तिला आकाश दिसला. त्याला शौर्या घरी आलेली माहीत नव्हती, तिला पाहून तो एकदम शॉक झाला आणि गालावर कोणाला न दिसेल असे हसू उमटले. शौर्या ने चोर नजरेने त्याच्याकडे बघितले आणि तिथून निघून गेली. शौर्या ची सासू तिला म्हणाली,
अग हीच साडी घालायची असे काही नव्हते...
आई मला आवडली हो....
बर चल.....
त्या देव्हाऱ्यात गेल्या आणि तिला नमस्कार करायला सांगितला. तिथून उठून तिला तिच्या रूम मध्ये चुलत नणंद घेऊन गेल्या. दार उघडताच दाराच्या भोवती सगळ्या जणी उभ्या झाल्या....
वहिनी चला काढा लवकर पैसे त्याशिवाय एन्ट्री नाही.....
बर मी आईच्या रूम मध्ये जाते....
गमतेचा भाग म्हणून शौर्या जायला निघाली....
हे काय वहिनी, असे कसे.....
शौर्या ने लगेच आपली पर्स त्यांच्या हाती दिली आणि म्हणाली,
हवे तेवढे घ्या.....
त्या सगळ्या तिथून निघून गेल्या. रूम खूप सुंदर सजवली होती. दिवसभराची मेहनत सगळी दिसून येत होती. ती आतमध्ये जाते न जाते तिला ऑफिस मधून फोन आला....
हॅलो मिस शौर्या.....
हॅलो सर.....
आय थिंक तुम्ही कामात नसालच...
यस सर...Any प्रॉब्लेम ?
केस संदर्भात बोलायचे होते....
Yes सर....
केसमध्ये नवीन क्यू इंक्लुड झाला....
काय ते ..?
हे गुन्हेगार एका परदेशी गँग ला मिळून आहेत. आणि आपल्या देशाला घातक अशी यांची प्लॅंनिंग आहे.....
तिने आपल्या तोंडावर हात ठेवला... तेवढ्यात आकाश रूम मध्ये आला होता. परंतु शौर्या फोनवर बोलते म्हणून तो तिथेच बाजूला उभा राहून तिचे बोलणे ऐकत होता...
बापरे... तरीच मला केस चा धागा देखील मिळत नव्हता....
पण मिस शौर्या पुढील काही दिवस ही केस आपल्यासाठी टास्क आहे....
Yes सर आय अंडरस्टॅण्ड...मी सकाळीच ऑफिसला येऊन पुन्हा फेरतपासणी करते....
आपल्याला सकाळची वाट बघायची नाही.. आत्ताच काम सुरू करावे लागेल. कारण ती घातक प्लांनिंग जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत ऑफिसला आपल्याला दिवस रात्र काम करावे लागेल....
Ok सर....
मला या सगळ्या फाईल चे अपडेट उद्या सकाळ पर्यंत हवे.....
पण सर...आज माझी...
नो एक्सक्युझेस मिस शौर्या....इट्स अ बिग मिशन......
Yes सर सॉरी.…..
तिने लगेच फोन ठेवला आणि खिडकीत बघत विचार करू लागली. आपण आकाशला कसे समजवावे.... आधीच लग्नाला 15 दिवस झाले होते आणि दोघांनी सोबत वेळ देखील घालवला नव्हता. आता ती या मिशन चे कसे सांगावे या विचारात होती मागून तिच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला.....
अरे तू....
मी सगळं ऐकलं आहे.. जा कर ऑफिस चे काम....
अरे आकाश ते मिशन...
त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला,
मला माहीत आहे... आणि सध्या देशापेक्षा जास्त महत्वाची आपली मधुचंद्राची रात्र नाही......
आकाश....आता ही केस किती दिवस चालेल माहीत नाही....मे बी महिने सुद्धा....
थांबुया..... तू मनाने तयार नसेल तर काय फायदा ना...त्यापेक्षा वेळ देऊया एकमेकांना.....
सॉरी आकाश.... पण....
फक्त घरात कोणाला काहीही नको सांगूस... तू कर काम...
असे म्हणून तो सोफ्यावर बसला... आणि त्याचे लॅपटॉप उघडून काहीतरी काम करू लागला....शौर्याकडे एवढा वेळ नव्हता की त्याची समजून घालेल तिने सुद्धा फटाफट साडी काढून आपल्या ड्रेस घातला आणि लगेच कामाला लागली.... काम करता करता रात्रीचे 12 वाजून कधी गेले हे दोघांना देखील कळले नाही. शेवटी आकाश तिला म्हणाला,
शौर्या, किती वेळ आहे....
ती आपल्या हातातील फाईलमध्ये डोकं ठेवूनच म्हणाली,
फुल नाईट यार.....
अरे, उद्या ऑफिस आहे, झोप घे थोडी....
या, लवकर काम झाले तर.....
मी झोपतो, तू ही लवकर ये झोपायला....
तो त्याच सोफ्यावर लेटला आणि लगेच झोपी सुद्धा गेला. शौर्या खुर्चीत बसून होती, तिचे काम सुरू होते. ती काम सोडून त्याच्याजवळ गेली. त्याच्या अंगावर पांघरून टाकले. आणि स्वतःशीच म्हणाली,
सॉरी आकाश, कर्तव्यापुढे हे ही माझे एक कर्तव्य आहे हे माहीत असूनही मला काहीही करता येत नाही..... त्याच्या केसांवरून तिने हात फिरवला. आणि पुन्हा कामाला लागली.....
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
Comments
Post a Comment