भाग सहा -
सकाळीच आकाश ला जाग आली. त्याने बघितले, शोर्या डोके टेबल वर ठेवून झोपली होती, तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या अंगावर पांघरून टाकले. तोच तीला जाग आला...डोळे पुसत ती म्हणाली,
व्हेरी गुड मॉर्निंग आकाश...
गुड मॉर्निंग प्रिन्सेस.....
जा लवकर अंघोळ कर, सोबत कॉफी पिवूया....
आलेच....म्हणत ती बाथरूमकडे जायला निघाली आणि लगेच वापस आली व तिने आकाशला पाठीमागून हग केले.....
Sorry आकाश......
त्याने दोन्ही हातानी तिला समोर घेतले आणि समोरून मिठीत घेतले व म्हणाला,
तू मला कोणत्याही टेन्शन मध्ये नसताना जवळ पाहिजेस......
तिने घड्याळात बघितले आणि त्याला सोडत पळत बाथरूममध्ये गेली. लगेच भराभर आवरले आणि किचन मध्ये गेली....
आई, काय स्वयंपाक करू..?
अग फक्त आज तू गोड शिरा तेवढा कर, बाकीचे बाई करेल...
ठीक आहे....
तिने लगेच शिरा बनवला आणि आईला म्हणाली,
आई, मी निघू का..? मला लवकर जायचे आहे.....
आणि जेवण, ....
मी काही खाऊन घेईल... आत्ता नको...
आणि ती तशीच निघाली, आईने आतूनच आवाज दिला....
हळू जा अग..... आणि डबा दिलाय तो खाऊन घे आठवणीने...
हो आई, येते.....
शौर्याचे रोजच असे सुरू झाले, सकाळी गेले की घरी यायला बराच उशीर व्हायचा. आठवड्यातून सुट्टी सुद्धा नसायची, आईला तिची काळजी वाटायची, तेव्हा वडील समजवत असे...,आणि आकाश सुद्धा घरी आल्यावर कामात गुंतून असायचा आई त्याला नेहमी म्हणायची,...
अशाने तुमचा संसार कसा व्हायचा..?
त्यावर दोघेही उडवा उडवीचे उत्तर देत असे.... शौर्या ची केस सुटायला तीन महिने लागले. दोघांचे नाते सूर्य आणि चंद्रासारखे झाले, दोघेही एकमेकांना दिसत नव्हते. तीन महिन्यानंतर शौर्याला दोन दिवसाच्या सुट्ट्या होत्या. आणि त्या दोन दिवसात आकाशचा वाढदिवसही..... तिने त्याला सरप्राईज द्यायचे ठरवले......पण सरप्राईज काय द्यावे हा विचार करत असताना तिच्या डोक्यात एक विचार चमकला...,तिने दुसऱ्या दिवशी आकाशच्या मित्रांना बोलून सगळी प्लांनिंग केली त्या रात्री तीने केक सुद्धा बोलावून घेतला. तिने आई बाबांना सुद्धा सांगितले होते. ती नेहमीप्रमाणे काम उरकून रूममध्ये गेली आणि आकाश जवळ गेली, त्याच्या होतील लॅपटॉप तिने बाजूला केले...
आकाश, आज आपल्या लग्नाला चार महिने होत आहेत.....या चार महिन्यात आपण निवांत जवळ कधी बसलो का..?
मॅडम तुमची केसच सुटत नव्हती.....
तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवले आणि त्याचा हात हातात घेतला....
कर्तव्य पार पाडत असताना अनेक स्वप्नांना दूर लोटावे लागते ना.....
स्वप्न पूर्ण करण्याची संधी पून्हा येते पण कर्तव्य वेळीच पार पाडावी लागतात बायको.....
शौर्याने दोन्ही हाताने त्याच्या चेहऱ्याला पकडले, आणि स्वतःचा चेहरा त्याच्याजवळ नेला, त्याच्या कपाळावर अलगद चुंबन घेतले आणि त्याच्या कानात हळूच म्हणाली,
विष यु अ व्हेरी हॅपी बर्थडे डिअर...
तींने तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवले आणि त्यानेसुध्दा तिला आपल्या बाहुपाशात ओढले होते.....लगेच रूम चे दार वाजले म्हणून तिने दार उघडले आणि सर्व कुटुंबानी मिळून त्याचा वाढदिवस साजरा केला. तिने ठरवले होते की आज चा दिवस आकाश ला कायम स्मरणात राहील असे काही करूया.... दुसऱ्या दिवशी ती त्याच्या समोर उभी राहिली....
गुड मॉर्निंग जान.....
तिला पाहून आकाश शॉक झाला होता. शौर्या ने कधी नव्हे ते साडी नसली होती. तिने साडी घातलेली आकाशला खूप आवडायचे पण रोज वर्दी आणि घरी आल्यावर ड्रेस म्हणून ती साडी घालायची नाही. आज मुद्दाम तिने साडी घातली आणि आकाश ला म्हणाली,
लवकर उठ, आपल्याला बाहेर जायचे आहे....
तो लगेच उठला आणि आवरून घेतले..दोघेही बाहेर गेले, दिवसभर एन्जॉय केला. मनसोक्त वेळ सोबत घालवला आणि 5 च्या सुमारास घरी आले. घरी पोहचताच शौर्याने त्याच्या मित्राला मॅसेज टाकला. ते मित्र आलेत आणि त्याला घेऊन गेले तो येईपर्यंत शौर्याने मस्त हॉल सजवला. आणि लाईट बंद करून ठेवले..आकाश घरी आला तेव्हा त्याला त्याच्या मित्रांचे गोड सरप्राईज दिले. शौर्या हातात केक घेऊन आली. तिने सुंदर साडी नेसली होती. आणि तिने त्याच्यासाठी काही लाईन गायल्या..... आणि त्याची सायंकाळ गोड गेली होती. ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे....
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
पुढील भाग उद्या याच आमच्या ब्लॉग वर. आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे (मराठी लेख व कथा) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. एक चिट्ठी...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
Comments
Post a Comment