Skip to main content

झुंज.....

नीताची नववी झाली होती. दहावीचे वर्ष म्हणून ती विशेष लक्ष देत होती. पण म्हणतात ना, दुधात एक लिंबाचा थेंबही दूध नासण्यास समर्थ आहे. तिचा घरात संकटाचे वारे वाहू लागले. आणि त्या वाऱ्याचा तिच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. घरची परिस्थिती बेताची, त्यात खाणारी तोंडे भरपूर, त्यामुळे शिक्षण फार क्षुल्लक वाटू लागले.घरच्यांनी यापुढे शिकायचे नाही. दोन पैसे आणायला मदत करायची असे सांगून हातातील पुस्तक घेत विळा दिला. शाळेत जाऊन टी सी ची मागणी केली. शिक्षकाने तिला प्रेमाने विचारले, बाळ, तू हुशार मुलगी, मग असे शाळा सोडण्याचा निर्णय का ???? सर, मलाही शाळा सोडायची इच्छा नाही असे म्हणत तिने घरची सगळी कहाणी सांगितली. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी चर्चा करत तिच्या घरच्यांशी बोलायचे ठरवले. नमस्कार,मी नीताच्या शाळेतील शिक्षक. माझं नाव, रमेश पाटील मी नीताचा वर्गशिक्षक, अस होय, या की मास्तर, बसा, आव ये रुखमे, मास्तरासनी प्याया पाणी आन की... रुखमा डोक्यावरचा पदर सावरत पाणी घेऊन आली, पाणी दिले आणि मास्तराच्या तोंडाकडे एकटक पाहू लागली. अव ये रुखमे, अशी अधाशागत काय पायलीस, जा, चा टाक की, नको नको, मला काही नको मी आपल्याल...

सरप्राईज... (भाग अंतिम)

                                                                                                भाग सहा वरून... 

भाग अंतिम -

शौर्या ने बाहेरचे सगळे आटोपले आणि स्वयंपाक केला. सगळ्यांची जेवण झाली आणि ती रूम मध्ये गेली. आकाश बाहेरच बाबांबरोबर गप्पा करत होता तिने मस्त मेकअप केला. आणि तिने  आकाश ला मॅसेज केला.....

तुझं शेवटचं सरप्राईज इझ वेटिंग डिअर......

तो लगेच तिथून उठला आणि रूम मध्ये गेला.

तिला बघताच आकाश चा तोल सुटला. ती इतकी सुंदर दिसत होती की तो तिच्याकडे बघून पुरता गोंधळला.... तिने त्याचा हात धरून आणले....

आकाश असा काय बघतोय.....

पुन्हा हरवलोय मी तुझ्या सौन्दर्यात....

काहीही काय बोलतोय.....

तो तिच्याजवळ आला पण लगेच थांबला.....शेवटी शौर्याच त्याच्या जवळ गेली. तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या ओठावर आपले ओठ टेकले..... त्याने तिला घट्ट मिठी मारली. तिने मिठी सोडवली व त्याला म्हणाली,

तुझ्या आयुष्यात खूप गोष्टी महत्त्वाच्या असतील .....कधी कधी तुला त्या सहज ही मिळत असतील.....

त्याने तिच्या केसातून हात फिरवला..आणि म्हणाला,

तू सहज नाही मिळाली.....

तुला भरपूर गिफ्ट आलेत, सरप्राईज पण आलेत... माझ्याकडे तेवढे मोठे देण्यास काहीही नाही आकाश.....

तूझी साथ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे....तेच बेस्ट गिफ्ट आहे माझे.....

तिने तिचा हात पुढे केला आणि मूठ उघडली ,त्याच्याकडे देत म्हणाली,

तुझं गिफ्ट..... चार महिन्यापासून जे तुझं असून तुला मिळालं नाही....हॅपी बर्थडे डिअर....

त्याने ते बघितले आणि तीला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली....त्याने तिला उचलले आणि तिच्या कानात म्हटले,

हे सरप्राईज माझ्या आयुष्याला वळण देतंय.....थँक्स डिअर.....

त्याने तिला पलंगावर बसवले, तिच्या साडीच्या पदराला हात लावला आणि हळूच तिच्याकडे डोळ्याने संमती मागितली, तिने डोळे बंद केले आणि त्याच डोळ्यांनी त्याला होकार दिला.......

त्यांच्या अनोख्या मिलनात साऱ्या आसमंतानी डोळे झाकले होते.......

( जबाबदार्या आणि कर्तव्य पूर्ण करतांना एका स्त्री ची ओढाताण होते. त्यावेळी आरडाओरडा न करता तिला थोडे समजून घ्या . नक्कीच ती तुम्हाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेल . कथेची संकल्पना आवडल्यास नक्की कॉमेंट्स करा. )
                    - लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत.

आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे (मराठी लेख व कथा) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.

आमच्या इतर लेख आणि  गोष्टी :

१. एक चिट्ठी...

२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.

३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण

४. सुंदरता आणि चारित्र्य...

Comments

  1. उत्तम कथालेखन

    ReplyDelete
  2. कर्तव्य व जबाबदारी या दोन गोष्टींची घालमेल दिसून येते. शौर्या व आकाश यांच्या आयुष्याला शौर्याने दिलेलं सरप्राईज मुळे एक वेगळं वळण मिळतं. खूप सुंदर कथा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आपण दिलेला प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.

      टिम : गोष्टीची डायरी

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सरप्राईज...(भाग दोन)

                                                                                              मागील भाग >  भाग एक वरून... भाग दोन - आज शौर्याचे लग्न होते, आनंदाचा क्षण होता.घरात घाई गडबड सुरू झाली. सकाळचे सहा वाजले होते आणि तिला आकाश च्या फोन ने जाग आली,... गुड मॉर्निंग प्रिन्सेस..... व्हेरी गुड मॉर्निंग आकाश.... झाली तयार... तुझ्या फोन ने जाग आली, रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले.  तुझी झोप मोड केली का मी??? अरे नाही उलट उठवून बरे केलेस नसता मला सगळे आवरायला वेळ झाला असता... बर तू हो फ्रेश,  मॅडम लग्नात बोलवालं ना मला...... आकाश मस्करी च्या मूड मध्ये म्हणाला तिनेही त्याला मस्करी ने प्रतिसाद दिला, बघू मूड झाला तर बोलवेन..... दोघांनही फोन ठेवले व तयारीला लागले..... लग्नघटिका जवळ आली,दोघेही मांडवात बसले, चंद्र तारे ही लाजेल असे दोघेह...

एक चिट्ठी... ( भाग अंतिम )

                             (  भाग एक < येथे वाचा )                                                                                                     भाग पाच वरून... भाग अंतिम.... एवढेच चिठ्ठी त त्याने लिहले.गायत्री ती चिठ्ठी वाचतच उठली आणि तिने अमित ला घट्ट मिठी मारली. आणि दोघेही अश्रूला वाट करून देत होते.  अमित तुला माहीत असूनही का तू काल माझ्या जवळ आलास. का तुझं आयुष्य बरबाद केलंस अमित....मला एड्स कसा झाला ते माझ्यासाठी महत्वाचे नाही पण तुला माझ्यामुळे एड्स नको व्हायला.... एका रात्रीत तुझं आयुष्य का वाया घातलं  मला थांबूउ शकला असतास तू अमित.... अमित तीच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला, मल...