भाग अंतिम -
शौर्या ने बाहेरचे सगळे आटोपले आणि स्वयंपाक केला. सगळ्यांची जेवण झाली आणि ती रूम मध्ये गेली. आकाश बाहेरच बाबांबरोबर गप्पा करत होता तिने मस्त मेकअप केला. आणि तिने आकाश ला मॅसेज केला.....
तुझं शेवटचं सरप्राईज इझ वेटिंग डिअर......
तो लगेच तिथून उठला आणि रूम मध्ये गेला.
तिला बघताच आकाश चा तोल सुटला. ती इतकी सुंदर दिसत होती की तो तिच्याकडे बघून पुरता गोंधळला.... तिने त्याचा हात धरून आणले....
आकाश असा काय बघतोय.....
पुन्हा हरवलोय मी तुझ्या सौन्दर्यात....
काहीही काय बोलतोय.....
तो तिच्याजवळ आला पण लगेच थांबला.....शेवटी शौर्याच त्याच्या जवळ गेली. तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या ओठावर आपले ओठ टेकले..... त्याने तिला घट्ट मिठी मारली. तिने मिठी सोडवली व त्याला म्हणाली,
तुझ्या आयुष्यात खूप गोष्टी महत्त्वाच्या असतील .....कधी कधी तुला त्या सहज ही मिळत असतील.....
त्याने तिच्या केसातून हात फिरवला..आणि म्हणाला,
तू सहज नाही मिळाली.....
तुला भरपूर गिफ्ट आलेत, सरप्राईज पण आलेत... माझ्याकडे तेवढे मोठे देण्यास काहीही नाही आकाश.....
तूझी साथ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे....तेच बेस्ट गिफ्ट आहे माझे.....
तिने तिचा हात पुढे केला आणि मूठ उघडली ,त्याच्याकडे देत म्हणाली,
तुझं गिफ्ट..... चार महिन्यापासून जे तुझं असून तुला मिळालं नाही....हॅपी बर्थडे डिअर....
त्याने ते बघितले आणि तीला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली....त्याने तिला उचलले आणि तिच्या कानात म्हटले,
हे सरप्राईज माझ्या आयुष्याला वळण देतंय.....थँक्स डिअर.....
त्याने तिला पलंगावर बसवले, तिच्या साडीच्या पदराला हात लावला आणि हळूच तिच्याकडे डोळ्याने संमती मागितली, तिने डोळे बंद केले आणि त्याच डोळ्यांनी त्याला होकार दिला.......
त्यांच्या अनोख्या मिलनात साऱ्या आसमंतानी डोळे झाकले होते.......
( जबाबदार्या आणि कर्तव्य पूर्ण करतांना एका स्त्री ची ओढाताण होते. त्यावेळी आरडाओरडा न करता तिला थोडे समजून घ्या . नक्कीच ती तुम्हाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेल . कथेची संकल्पना आवडल्यास नक्की कॉमेंट्स करा. )
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत.
आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे (मराठी लेख व कथा) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. एक चिट्ठी...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
उत्तम कथालेखन
ReplyDeleteधन्यवाद धनश्रीजी
Deleteकर्तव्य व जबाबदारी या दोन गोष्टींची घालमेल दिसून येते. शौर्या व आकाश यांच्या आयुष्याला शौर्याने दिलेलं सरप्राईज मुळे एक वेगळं वळण मिळतं. खूप सुंदर कथा.
ReplyDeleteधन्यवाद, आपण दिलेला प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
Deleteटिम : गोष्टीची डायरी