Source Image: Google
आज सहज बाहेरून आवाज आला म्हणून गॅलरीमध्ये जाऊन बघितले. काही मुले खाली खेळत होती. दुपारचे बारा वाजले होते आणि ऊन ही कडाक्याच होत. ती मुले साधारणतः काही आठ वर्षाची तर काही अकरा-बारा वर्षांची होती. मी दार उघडताच त्या एका मुलांनी मला विचारले.
"ताई ग, आमच्या जवळचा फडा घेतेस का...???"
मी आधी त्यांच्याकडे बघितलं. त्याची अवस्था काही बरी नव्हती. काही पुटळे जवळ होते एक छोटाशी बॉटल होती पण ती रिकामीच होती. आणि त्यांच्यातील सगळ्यात लहान मुलगी "घरी चल ना..." चा तकादा लावत होती. मोठी मुलगी तिला बळेच गप करत होती.
त्या मुलाने मला पुन्हा विचारले,
" ताई खूप चांगले आहेत फडे, घ्या ना....."
मला त्यांच्याकडे बघून फार वाईट वाटत होतं, मी त्याच्या पायाकडे बघत म्हणाले, तुझ्या पायात चप्पल नाही, ऊन तापतय आणि तू अनवाणी पायाने का फिरतोय ?
तो म्हणाला : "अग ताई म्हणून तर फडे विकतोय, मला चप्पल घ्यायची आहे".
मी खाली गेली व त्याच्या जवळचे दोन्ही फडे गरज नसताना घेतले व त्या बदल्यात पैसे दिले.
मी त्यांना विचारले "भूक लागली असेल ना ?"
ते म्हणाले खुप भूक लागली ताई... मी वर येऊन त्यांना जेवायला पोळी भाजी घेऊन आली त्यांना जेवायला दिले. तुम्ही असे उन्हात का फिरताय....?
त्याने एकच वाक्यात मला निशब्द करून टाकले!
"ताई तुझ्या कडे जेवायला आहे म्हणून तू घरात आहेस, पण आम्ही फिरून जेवण्याची सोय करतोय"
खरच होत ते.... माझ्याकडे सगळं होत म्हणून मला कुलरमध्ये राहूनही गरमी होते, आणि जेवायला घरात भरपेट असूनही नवनवीन खावेसे वाटते. पण त्यांनी कुठे जावं ?
वणवण हिंडण्या शिवाय त्यांना काय गत्यंतर होत. माणसाचा स्वाभिमान तोपर्यंत टिकतो जोपर्यंत त्यांचं पोट भरलेलं असत. रिकाम्या पोटी ऊन, साउली, घर, दार, स्वछता, स्वाभिमान काहीच नाही दिसत हो.... दिसते फक्त पोटाची खळगी.....तेही उपास घडलेली. आई विना पोर जस पोरकं होत तसेच भुके विना माणूस आयुष्यतून पोरका होतो. मूठभर लोक चैनीत जगत आहेत पण बाकी सगळे व्यक्ती कंठीत जीवन जगत आहेत. आज जेवायला मिळाले की देवाचे आभार मानतात....कसली हि न्यारी दुनियेची रित.
भूक माणसाला काही करायला लावते हे माहीत होतं पण भूक भीक मागायला लावते, हे पहिल्यांदा समजले होते.
कधी कधी असे वाटते की, खरच आमचा देश आत्मनिर्भर आहे का ??? आणि देश आत्मनिर्भर झाला (म्हणजे मोठं मोठे उद्योग उभे राहिले ) तर अश्या लोकांचे दिवस सुधारतील का ???
आपला देश सर्वसामान्य जनता चालवते की मूठभर लोक ??? एकीकडे डायटिंग चालू असत आणि एकीकडे एक वेळचे जेवण मिळवण्यासाठी मरमर .....
त्या मुलाचे उत्तर अजूनही डोक्यात गरगर फिरत राहते....
मग हा भुकेचा प्रश्न बघता सहजच मनात येते...
आपण नक्की कुठे राहतोय
भारतात की इंडियात......?
सत्य आणि सध्य परिस्थिती...
लेखिका: तेजस्विनी प्र. राऊत
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. हाक...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण
( आमच्या कथा आवडत असतील तर इतराना पाठवत रहा आणि प्रतिक्रिया देत रहा त्यामुळे आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते. नवीन गोष्टींसाठी नक्की सबस्क्राईब आणि शेअर कराल..धन्यवाद )
अप्रतिम
ReplyDeleteहे पण उत्तम.
ReplyDeleteग वर अनुस्वार देत चला. "काय ग" पेक्षा "काय गं" वाचायला बरं वाटतं (बर वाटत पेक्षा). किंवा "बरे वाटते" हे अजूनच शुद्धलेखन.
"...आत्मनिर्भर..." च्या तिथे sudden transition वाटत आहे. त्याआधी "मनाशी विचार येतो की ..." किंवा "कधी कधी असे वाटते की..." लिहले तर? लिहून वाचून पहा. बरे वाटेल ते ठेवा.
लिहत रहा. आणि हे शेअर करण्याची परवानगी द्या.
नक्की सर, आपण कोणतीही कथा शेअर करू शकता.👍😊
DeleteIt's so heartochy, real condition
ReplyDelete