Skip to main content

झुंज.....

नीताची नववी झाली होती. दहावीचे वर्ष म्हणून ती विशेष लक्ष देत होती. पण म्हणतात ना, दुधात एक लिंबाचा थेंबही दूध नासण्यास समर्थ आहे. तिचा घरात संकटाचे वारे वाहू लागले. आणि त्या वाऱ्याचा तिच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. घरची परिस्थिती बेताची, त्यात खाणारी तोंडे भरपूर, त्यामुळे शिक्षण फार क्षुल्लक वाटू लागले.घरच्यांनी यापुढे शिकायचे नाही. दोन पैसे आणायला मदत करायची असे सांगून हातातील पुस्तक घेत विळा दिला. शाळेत जाऊन टी सी ची मागणी केली. शिक्षकाने तिला प्रेमाने विचारले, बाळ, तू हुशार मुलगी, मग असे शाळा सोडण्याचा निर्णय का ???? सर, मलाही शाळा सोडायची इच्छा नाही असे म्हणत तिने घरची सगळी कहाणी सांगितली. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी चर्चा करत तिच्या घरच्यांशी बोलायचे ठरवले. नमस्कार,मी नीताच्या शाळेतील शिक्षक. माझं नाव, रमेश पाटील मी नीताचा वर्गशिक्षक, अस होय, या की मास्तर, बसा, आव ये रुखमे, मास्तरासनी प्याया पाणी आन की... रुखमा डोक्यावरचा पदर सावरत पाणी घेऊन आली, पाणी दिले आणि मास्तराच्या तोंडाकडे एकटक पाहू लागली. अव ये रुखमे, अशी अधाशागत काय पायलीस, जा, चा टाक की, नको नको, मला काही नको मी आपल्याल...

त्याचे ते निशब्द उत्तर.....

 

                                  Source Image: Google                                  


आज सहज बाहेरून आवाज आला म्हणून गॅलरीमध्ये जाऊन बघितले. काही मुले खाली खेळत होती. दुपारचे बारा वाजले होते आणि ऊन ही कडाक्याच होत. ती मुले साधारणतः काही आठ वर्षाची तर काही अकरा-बारा वर्षांची होती.  मी दार उघडताच त्या एका मुलांनी मला विचारले.

"ताई ग, आमच्या जवळचा फडा घेतेस का...???" 

मी आधी त्यांच्याकडे बघितलं. त्याची अवस्था काही बरी नव्हती. काही पुटळे जवळ होते एक छोटाशी बॉटल होती पण ती रिकामीच होती. आणि त्यांच्यातील सगळ्यात लहान मुलगी "घरी चल ना..." चा तकादा लावत होती. मोठी मुलगी तिला बळेच गप करत होती. 

त्या मुलाने मला पुन्हा विचारले,

" ताई खूप चांगले आहेत फडे, घ्या ना....."

मला त्यांच्याकडे बघून फार वाईट वाटत होतं, मी त्याच्या पायाकडे बघत म्हणाले, तुझ्या पायात चप्पल नाही, ऊन तापतय आणि तू अनवाणी पायाने का फिरतोय ?

तो म्हणाला : "अग ताई म्हणून तर फडे विकतोय, मला चप्पल घ्यायची आहे". 

मी खाली गेली व त्याच्या जवळचे दोन्ही फडे गरज नसताना घेतले व त्या बदल्यात पैसे दिले. 


मी त्यांना विचारले "भूक लागली असेल ना ?"  

ते म्हणाले खुप भूक लागली ताई... मी वर येऊन त्यांना जेवायला पोळी भाजी घेऊन आली त्यांना जेवायला दिले. तुम्ही असे उन्हात का फिरताय....?  

त्याने एकच वाक्यात मला निशब्द करून टाकले!

"ताई तुझ्या कडे जेवायला आहे म्हणून तू घरात आहेस, पण आम्ही फिरून जेवण्याची सोय करतोय" 


खरच होत ते.... माझ्याकडे सगळं होत म्हणून मला कुलरमध्ये राहूनही गरमी होते, आणि जेवायला घरात भरपेट असूनही नवनवीन खावेसे वाटते. पण त्यांनी कुठे जावं ?

वणवण हिंडण्या शिवाय त्यांना काय गत्यंतर होत. माणसाचा स्वाभिमान तोपर्यंत टिकतो जोपर्यंत त्यांचं पोट भरलेलं असत. रिकाम्या पोटी ऊन, साउली, घर, दार, स्वछता, स्वाभिमान काहीच नाही दिसत हो.... दिसते फक्त पोटाची खळगी.....तेही उपास घडलेली. आई विना पोर जस पोरकं होत तसेच भुके विना माणूस आयुष्यतून पोरका होतो. मूठभर लोक चैनीत जगत आहेत पण बाकी सगळे व्यक्ती कंठीत जीवन जगत आहेत. आज जेवायला मिळाले की देवाचे आभार मानतात....कसली हि न्यारी दुनियेची रित. 

        भूक माणसाला काही करायला लावते हे माहीत होतं पण भूक भीक मागायला लावते, हे पहिल्यांदा समजले होते. 

कधी कधी असे वाटते की, खरच आमचा देश आत्मनिर्भर आहे का ???  आणि देश आत्मनिर्भर झाला (म्हणजे मोठं मोठे उद्योग उभे राहिले ) तर अश्या लोकांचे दिवस सुधारतील का ???

आपला देश सर्वसामान्य जनता चालवते की मूठभर लोक ???   एकीकडे डायटिंग चालू असत आणि एकीकडे एक वेळचे जेवण मिळवण्यासाठी मरमर .....

त्या मुलाचे उत्तर अजूनही डोक्यात गरगर फिरत राहते....

मग हा भुकेचा प्रश्न बघता सहजच मनात येते...

आपण नक्की कुठे राहतोय


भारतात की इंडियात......?

सत्य आणि सध्य परिस्थिती...


                           

                                     लेखिका: तेजस्विनी प्र. राऊत

आमच्या इतर लेख आणि  गोष्टी :

१. हाक... 

२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.

३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण

४. सुंदरता आणि चारित्र्य...


 ( आमच्या कथा आवडत असतील तर इतराना पाठवत रहा आणि प्रतिक्रिया देत रहा त्यामुळे आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते. नवीन गोष्टींसाठी नक्की सबस्क्राईब आणि शेअर कराल..धन्यवाद )

Comments

  1. हे पण उत्तम.

    ग वर अनुस्वार देत चला. "काय ग" पेक्षा "काय गं" वाचायला बरं वाटतं (बर वाटत पेक्षा). किंवा "बरे वाटते" हे अजूनच शुद्धलेखन.

    "...आत्मनिर्भर..." च्या तिथे sudden transition वाटत आहे. त्याआधी "मनाशी विचार येतो की ..." किंवा "कधी कधी असे वाटते की..." लिहले तर? लिहून वाचून पहा. बरे वाटेल ते ठेवा.

    लिहत रहा‌. आणि हे शेअर करण्याची परवानगी द्या.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की सर, आपण कोणतीही कथा शेअर करू शकता.👍😊

      Delete
  2. It's so heartochy, real condition

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरप्राईज...(भाग दोन)

                                                                                              मागील भाग >  भाग एक वरून... भाग दोन - आज शौर्याचे लग्न होते, आनंदाचा क्षण होता.घरात घाई गडबड सुरू झाली. सकाळचे सहा वाजले होते आणि तिला आकाश च्या फोन ने जाग आली,... गुड मॉर्निंग प्रिन्सेस..... व्हेरी गुड मॉर्निंग आकाश.... झाली तयार... तुझ्या फोन ने जाग आली, रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले.  तुझी झोप मोड केली का मी??? अरे नाही उलट उठवून बरे केलेस नसता मला सगळे आवरायला वेळ झाला असता... बर तू हो फ्रेश,  मॅडम लग्नात बोलवालं ना मला...... आकाश मस्करी च्या मूड मध्ये म्हणाला तिनेही त्याला मस्करी ने प्रतिसाद दिला, बघू मूड झाला तर बोलवेन..... दोघांनही फोन ठेवले व तयारीला लागले..... लग्नघटिका जवळ आली,दोघेही मांडवात बसले, चंद्र तारे ही लाजेल असे दोघेह...

एक चिट्ठी... ( भाग अंतिम )

                             (  भाग एक < येथे वाचा )                                                                                                     भाग पाच वरून... भाग अंतिम.... एवढेच चिठ्ठी त त्याने लिहले.गायत्री ती चिठ्ठी वाचतच उठली आणि तिने अमित ला घट्ट मिठी मारली. आणि दोघेही अश्रूला वाट करून देत होते.  अमित तुला माहीत असूनही का तू काल माझ्या जवळ आलास. का तुझं आयुष्य बरबाद केलंस अमित....मला एड्स कसा झाला ते माझ्यासाठी महत्वाचे नाही पण तुला माझ्यामुळे एड्स नको व्हायला.... एका रात्रीत तुझं आयुष्य का वाया घातलं  मला थांबूउ शकला असतास तू अमित.... अमित तीच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला, मल...

एक चिट्ठी... ( भाग चार )

                                                                                                                                                भाग तीन वरून... भाग चार - आता तिच्या लक्षात आले होते की मुग्धा नावाचे कॅफे आहे आणि तिथे हा चहा साठी बोलवतोय. सहा वाजायला 10 मिनीटे बाकी होती, ती लगेच गाडी काढून तिकडे गेली. कॅफेमध्ये पाऊल टाकताच एक गाणं वाजल... आइये आप का ही इंतजार था...... ती आतमद्ये गेली आणि तेथील वेटर ने तिला वर जायला सांगितले.... पण वर जाताना पायऱ्यांच्या कठड्याला एक चिट्टी होती. तिने लगेच वाचायला घेतली. गायत्री,.....      ...