( भाग एक < येथे वाचा ) भाग पाच वरून...
भाग अंतिम....
एवढेच चिठ्ठी त त्याने लिहले.गायत्री ती चिठ्ठी वाचतच उठली आणि तिने अमित ला घट्ट मिठी मारली. आणि दोघेही अश्रूला वाट करून देत होते.
अमित तुला माहीत असूनही का तू काल माझ्या जवळ आलास. का तुझं आयुष्य बरबाद केलंस अमित....मला एड्स कसा झाला ते माझ्यासाठी महत्वाचे नाही पण तुला माझ्यामुळे एड्स नको व्हायला.... एका रात्रीत तुझं आयुष्य का वाया घातलं
मला थांबूउ शकला असतास तू अमित....
अमित तीच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला,
मला माझ्या प्रेमाची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची होती. आणि त्या एका रात्रीच्या आधारावर मी माझं उर्वरीत आयुष्य घालवणार आहे गायु....
I love you गायु
Love you too अमित
रडत रडत अमित बोलला,
मी तुला खूप मिस करेल गायु.....नको ना जाऊस अग.....
ती म्हणाली,
शेवटची कविता ऐकवशील का अमित
अमित नाही नाही म्हणू लागला...
तोच ती म्हणाली
प्लिज...
तो रडत रडत काही ओळी म्हणू लागला
माझे आयुष्य तुला लाभू दे,
तू माझी असुदे,
नको नेऊस देवा तिला...
जिने मला प्रेमाचा अर्थ समजून दिला !
आणि अमितच्या लक्षात आले की गायत्री ने मिठी सैल केली आणि बघताच त्याने जोरात हंबरडा फोडला...
गायु sssssss
सगळे आले आणि त्याला सावरू लागले त्याने सरणावर एक चिठ्ठी ठेवली...
माझं तुझ्यावर् खूप प्रेमआहे
गायु पुढच्या जन्मी माझीच बायको होशील ना????????
एवढं प्रेम करायचे सर तुम्ही तिच्यावर...
या प्रश्नाने तो भूतकाळातून बाहेर आला आणि म्हणाला,
करायचो नाही मॅडम आजही तेवढंच प्रेम करतो....
बर मॅडम मी निघू, उशीर होतोय मला.....
अमित तेथून निघाला आणि त्या झाडाजवळ आला.....
एक चिठ्ठी ठेवली व त्या झाडाकडे बघत म्हणाला,
बघितलस गायु तू म्हणाली होतीस ना... की खूप मोठा हो.... आज त्याची पावती मिळाली बघ...
आपल्या हातातील पारितोषिक दाखवत तो म्हणाला . पाऊस सुरू झाला आणि अमित च्या डोळ्यात आसवे तरंगले......
आनंदाचे आणि दुःखाचेही
लगेच गाणं वाजल....
किसीं रोज बारिष आये...
समजलेना बंदो मे मै हू....
( ही कथा पुर्णतः काल्पनिक आहे आणि ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा.....)
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
पुढील भाग उद्या याच आमच्या ब्लॉग वर. आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे (मराठी लेख व कथा) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. हाक...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
The ending is really emotional👌🏻❤️
ReplyDeleteछान लिहिलं👍🏼👍🏼🥇
खुपच सुंदर लिखाण ताई , अप्रतिम 👌👌👌👌👌
ReplyDeleteमनाला ओढ होती लागून पुढे काय होईल. अतिशय सुस्वरूप कथा होती मन चिंब न्हालं कथा वाचून.
ReplyDeleteखूप छान.....वाचून खूप छान वाटलं मस्त लिहाल आहे.....👌🏼👌🏼👌🏼
ReplyDelete