Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

झुंज.....

नीताची नववी झाली होती. दहावीचे वर्ष म्हणून ती विशेष लक्ष देत होती. पण म्हणतात ना, दुधात एक लिंबाचा थेंबही दूध नासण्यास समर्थ आहे. तिचा घरात संकटाचे वारे वाहू लागले. आणि त्या वाऱ्याचा तिच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. घरची परिस्थिती बेताची, त्यात खाणारी तोंडे भरपूर, त्यामुळे शिक्षण फार क्षुल्लक वाटू लागले.घरच्यांनी यापुढे शिकायचे नाही. दोन पैसे आणायला मदत करायची असे सांगून हातातील पुस्तक घेत विळा दिला. शाळेत जाऊन टी सी ची मागणी केली. शिक्षकाने तिला प्रेमाने विचारले, बाळ, तू हुशार मुलगी, मग असे शाळा सोडण्याचा निर्णय का ???? सर, मलाही शाळा सोडायची इच्छा नाही असे म्हणत तिने घरची सगळी कहाणी सांगितली. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी चर्चा करत तिच्या घरच्यांशी बोलायचे ठरवले. नमस्कार,मी नीताच्या शाळेतील शिक्षक. माझं नाव, रमेश पाटील मी नीताचा वर्गशिक्षक, अस होय, या की मास्तर, बसा, आव ये रुखमे, मास्तरासनी प्याया पाणी आन की... रुखमा डोक्यावरचा पदर सावरत पाणी घेऊन आली, पाणी दिले आणि मास्तराच्या तोंडाकडे एकटक पाहू लागली. अव ये रुखमे, अशी अधाशागत काय पायलीस, जा, चा टाक की, नको नको, मला काही नको मी आपल्याल...

एक चिट्ठी... ( भाग तीन )

                                                                                                                                                  भाग दोन वरून... भाग तीन डिअर गायत्री,              मला माहित आहे, तू हट्ट करशील येण्यासाठी. पण मला माहित आहे तुला दवाखान्याची फार भिती वाटते. आणि  दवाखान्यात तू बेडवर मला असे झोपलेले बघु नये असं वाटते. आणि मी लवकरच बरा होणार आहे, म्हणून म्हणतोय नको येऊस आणि तुझ्या घरचे काळजी करत असतील तेव्हा जा घरी सोबतच माझा मोबाईल नंबर पाठवला आहे. वाटले तर कर फोन पण वाटलं तरच कर उगाच नंबर दिल...

एक चिट्ठी... ( भाग दोन )

                                                                                                             मागील भाग  >    भाग एक वरून.... भाग दोन - यातही नाव लिहले नाही.... मरुदे मला काय मी नाही शोधत बसणार क्लु त्याचा.... गायत्री खुर्चीवरून उठत म्हणाली. तोच प्रगती म्हणाली, अग मी शोधला बघ दाते, पालक, छत्र, आई वडील नाही आणि काय बोलला तो अनाथ आश्रममध्ये जाणार आहे तो.... सापडला !!! पुढचा क्लु आहे 'अनाथ आश्रम'. गायत्री तिला ओढत म्हणाली, तूच जा तिकडे, मी जाणार नाही कळलं. अग ऐक तर नेमका कोण आहे ते तर बघूया... दुसऱ्या दिवशी त्यांनी रस्त्यावर कोणते अनाथाश्रम पडते ते बघितले व तिघीही तिथे गेल्या..... तिथे जाताच एक छोटासा मुलगा तिच्या जवळ आला आणि गुलाबच...

एक चिट्ठी... ( भाग एक )

भाग  एक गायत्री अग बाळा उठतेस ना...? गायत्रीची आई तिच्या रूम मधील पडदे उघडत गायत्री ला उठवत होती. अग आई जरा वेळ झोपू दे ना.... आत्ताशी कुठे आठ वाजलेत... गायत्री डोक्यावर पांघरून सरकवत इकडले तोंड तिकडे फिरवत म्हणाली. तेव्हा आई तिच्या डोक्यावरील पांघरून काढत जोरात म्हणू लागली, ऐकलत का गायु चे बाबा, पोरगी आठ वाजलेत तरी उठत नाही आणि बाप काय तर तिचीच बाजू घेणार.... गायत्री उठून तिच्या बाबाच्या कुशीत जाऊन शिरली, आई हसत म्हणाली, आता बापलेकीच प्रेम उफाळून येणार....! असे म्हणत आई स्वयंपाक घरात डबा भरण्यासाठी निघून गेली. अग गायु, आज कॉलेज ला जाणार नाही का ग ....? गायत्री बाबांची मिठी घेत म्हणाली, म्हणजे काय आई जाणारच की, पण बाबाच्या कुशीची ऊब दिवसभर लागते मला. चल बाबा फ्रेश होऊन आले लगेच. लवकर ये गायु नाश्ता करायचा थांबतोय मी... गायत्री पळत जात म्हणाली, नको नको तू खाऊन घे मी अंघोळ झाली की पळणार आहे, आई टिफिन भरून ठेव उशीर झालाय. गायत्री ही तिच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी... थोडी लाडवलेली पण स्वभावाने अत्यंत सुंदर... समंजस, मोठ्याचा आदर करणारी, कोणासही घालून पाडून न बोलणारी, थोडी शांत, आणि ...

हाक ....

                                                      Image Source : Google, Edited : Dairy of  Stories अंश : बाबा, ओ बाबा बाबा : काय बेटा ..? अंश : मला खेळायचं आहे तुमच्यासोबत बाबा : पण मी कामात आहे,  अंश : पण बाबा , जरावेळ खेळा ना, बाबा : नाही बाळ,तू जा इकडून मला भरपूर कामे आहेत....... अंश : बाबा आपण एकदाच खेळू ना... बाबा : तुला सांगितलेले कळत नाही का?? जा इकडून... अंश रडावलेला चेहरा घेऊन त्याच्या रूम मध्ये गेला. काही वेळाने घरात आई आली, तो लगेच तिच्याजवळ गेला... अंश : आई, आपण खेळूया ना... आई : पिल्लू आई आत्ताच आली ना कामावरून,  अंश : आई चल ना ग खेळायला..... आई : बाबा जवळ जा ते खेळतील तुझ्याबरोबर.... अंश : आई ग बाबा येत नाही,निदान तू तरी चल ना... आई : बाबा मला भरपूर कामे आहेत आणि आता तू माझं डोकं नको खाऊस.... अंश : ये आई प्लिज ना... थोडा वेळ दे ना मला.... ( आता अंश मेडकुटीला आला...

त्याचे ते निशब्द उत्तर.....

                                      Source Image: Google                                    आज सहज बाहेरून आवाज आला म्हणून गॅलरीमध्ये जाऊन बघितले. काही मुले खाली खेळत होती. दुपारचे बारा वाजले होते आणि ऊन ही कडाक्याच होत. ती मुले साधारणतः काही आठ वर्षाची तर काही अकरा-बारा वर्षांची होती.  मी दार उघडताच त्या एका मुलांनी मला विचारले. "ताई ग, आमच्या जवळचा फडा घेतेस का...???"  मी आधी त्यांच्याकडे बघितलं. त्याची अवस्था काही बरी नव्हती. काही पुटळे जवळ होते एक छोटाशी बॉटल होती पण ती रिकामीच होती. आणि त्यांच्यातील सगळ्यात लहान मुलगी "घरी चल ना..." चा तकादा लावत होती. मोठी मुलगी तिला बळेच गप करत होती.  त्या मुलाने मला पुन्हा विचारले, " ताई खूप चांगले आहेत फडे, घ्या ना....." मला त्यांच्याकडे बघून फार वाईट वाटत होतं, मी त्याच्या पायाकडे ...