Skip to main content

झुंज.....

नीताची नववी झाली होती. दहावीचे वर्ष म्हणून ती विशेष लक्ष देत होती. पण म्हणतात ना, दुधात एक लिंबाचा थेंबही दूध नासण्यास समर्थ आहे. तिचा घरात संकटाचे वारे वाहू लागले. आणि त्या वाऱ्याचा तिच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. घरची परिस्थिती बेताची, त्यात खाणारी तोंडे भरपूर, त्यामुळे शिक्षण फार क्षुल्लक वाटू लागले.घरच्यांनी यापुढे शिकायचे नाही. दोन पैसे आणायला मदत करायची असे सांगून हातातील पुस्तक घेत विळा दिला. शाळेत जाऊन टी सी ची मागणी केली. शिक्षकाने तिला प्रेमाने विचारले, बाळ, तू हुशार मुलगी, मग असे शाळा सोडण्याचा निर्णय का ???? सर, मलाही शाळा सोडायची इच्छा नाही असे म्हणत तिने घरची सगळी कहाणी सांगितली. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी चर्चा करत तिच्या घरच्यांशी बोलायचे ठरवले. नमस्कार,मी नीताच्या शाळेतील शिक्षक. माझं नाव, रमेश पाटील मी नीताचा वर्गशिक्षक, अस होय, या की मास्तर, बसा, आव ये रुखमे, मास्तरासनी प्याया पाणी आन की... रुखमा डोक्यावरचा पदर सावरत पाणी घेऊन आली, पाणी दिले आणि मास्तराच्या तोंडाकडे एकटक पाहू लागली. अव ये रुखमे, अशी अधाशागत काय पायलीस, जा, चा टाक की, नको नको, मला काही नको मी आपल्याल...

हाक ....

 


                                                    Image Source : Google, Edited : Dairy of  Stories


अंश : बाबा, ओ बाबा

बाबा : काय बेटा ..?

अंश : मला खेळायचं आहे तुमच्यासोबत

बाबा : पण मी कामात आहे, 

अंश : पण बाबा , जरावेळ खेळा ना,

बाबा : नाही बाळ,तू जा इकडून मला भरपूर कामे आहेत.......

अंश : बाबा आपण एकदाच खेळू ना...

बाबा : तुला सांगितलेले कळत नाही का?? जा इकडून...


अंश रडावलेला चेहरा घेऊन त्याच्या रूम मध्ये गेला. काही वेळाने घरात आई आली, तो लगेच तिच्याजवळ गेला...


अंश : आई, आपण खेळूया ना...

आई : पिल्लू आई आत्ताच आली ना कामावरून, 

अंश : आई चल ना ग खेळायला.....

आई : बाबा जवळ जा ते खेळतील तुझ्याबरोबर....

अंश : आई ग बाबा येत नाही,निदान तू तरी चल ना...

आई : बाबा मला भरपूर कामे आहेत आणि आता तू माझं डोकं नको खाऊस....

अंश : ये आई प्लिज ना... थोडा वेळ दे ना मला....

( आता अंश मेडकुटीला आला. तो रागातच बोलला, आई ला त्याने रागात बोललेलं आवडलं नाही. तिने त्याला ओरडा देत पाठवून दिले. तो परत त्याच्या रूम मध्ये गेला. काही वेळाने तो वडिलांजवळ गेला....)

अंश : बाबा काम झाले ????

बाबा : हो बेटा होतच आले.... का रे

अंश : बाबा माझ्या सोबत चल ना खेळायला......

बाबा : नाही बेटा मी थकलो आहो मला झोपायचं आहे.... 

असे म्हणत बाबा रूम मध्ये निघून गेला.

काही वेळाने तो आई जवळ गेला. 

अंश : आई, माझ्या हाताला लागले ग...

तिने एक ट्यूब दिला आणि म्हणाली,

आई : हा घे आणि हाताला लाव....

अंश : आई, तू मोबाईल च बघत आहेस ना.. निदान माझ्या हाताकडे बघ तरी......

आई : बेटा अजिबात वेळ नाही. जा झोप.. उशीर झालाय....

तो पुन्हा त्यांच्या रूम मध्ये गेला. आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला.


        असे काही दिवस चालू होते. एक दिवस त्या मुलाची आई पेपर चेक करत होती तेव्हा ती घळाघळा रडू लागली. ती पेपर बघून रडते आहे हे त्याच्या वडिलांच्या नजरेतून सुटले नाही. त्याने आपल्या हातातले लॅपटॉप सोडून तिच्या खांद्यावर हात ठेवला....

अंशचे बाबा : काय झालं स्वरा....रडत कशाला आहेस....

अंशची आई (स्वरा ): आज मी माझ्या शाळेतल्या मुलांना " देवबाप्पाना पत्र लिहायचे झाल्यास तुम्ही काय लिहणार???? असा विषय लिहायला दिला होता...... 

अरे वा मग छानच.... त्यात रडण्यासारखे काय आहे.????

तो पुन्हा आपले डोके लॅपटॉप मध्ये खुपसत म्हणाला,

अंशची आई (स्वरा ): एका मुलाने खूप भावुक निबंध लिहला आहे.....

अग चालायचंच तेवढ.....

अंशची आई (स्वरा ): तुला वाचून दाखवू का???

खर तर त्याला लॅपटॉप मधून वेळच नव्हता पण स्वरा भावुक झाली म्हणून लॅपटॉप मध्ये बघतच मानेने खुणावत हो म्हणाला....

तिने वाचायला सुरुवात केली....


तीर्थरूप देवबाप्पा,

           " माझे आईबाबा खूप सुंदर आहेत. आणि सतत कामात असतात. माझे वडील घरी राहूनच काम करतात पण त्यांचा मित्र ना एक लॅपटॉप आहे. ते त्याला सतत कुरवाळत असतात, त्याच्यासोबत जेवतात, त्याला सोबत घेऊन झोपतात आणि सकाळ सुद्धा त्यांची त्याला बघताच होते. त्यांना अजिबात वेळ नसतो. तरीही माझ्यावर खूप प्रेम करतात. मला खेळणे घेऊन देतात, मला मिनी बँकेत टाकायला पैसे देतात, पण खरं सांगू का देवबाप्पा..... मला ते वेळच देत नाही....

                    माझी आई खूप देखणी आहे. लोभस आहे. आणि कष्टीक पण आहे. दिवसभर ऑफिस मध्ये असते. सकाळी एकदा गेली की सायंकाळी च घरी येते.आणि तिला कामे खूप असावीत. फोन करण्यासाठी तिने मला मोबाईल सुद्धा घेऊन दिला आहे. पण तिला मला फोन करायला वेळच नसावा. घरी आल्यावर ती खूप थकलेली असते. त्यामुळे लगेच स्वयंपाक करते. मला आवडीचे करून द्यायला वेळ नसतो ना... म्हणून बरेच वेळा आम्ही बाहेरचे खातो. आणि तिचे काम आटोपले की ती मोबाईल घेऊन बसते.... मला कधी झोपवत पण नाही. मोबाईल मधील अंगाई लावून देते. पण एक आहे, बालक दिनाच्या दिवशी मला नवीन ड्रेस घालून देते, आणि वेगवेगळे माझे फोटो घेते आणि ते स्टेट्स ला ठेवते. मला वाटते माझी आई ते फोटो वर्षभर बघत असावी. कारण माझ्या कडे बघायला तिला वेळच कुठे असतो......

             देवबाप्पा, मी त्यांच्याविरुद्ध कम्प्लेन्ड नाही करत आहे.... पण तुला विचारायचे होते की, तुझ्या तिकडे पण असेच असतात का आई बाबा... मी एकदा पिक्चर मध्ये बघितलं होत की, तुझी आई तुला मांडीवर घेऊन भरवत होती, तुझ्यासाठी छान छान जेवण बनवत होती. तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे जातीने बघत होती.तुझे बाबा तुझ्यासोबत खेळत होते. तुला नवीन नवीन वस्तू बनवून देण्यासाठी मदत करत होते. म्हणून एक प्रश्न पडला आहे मला देवबाप्पा......


तुझ्या आई वडिलांचे ऑफिस नसते का???? 

              जरा तुझ्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांची भेट घ्यायला सांग ना.....त्यांना सुद्धा सांग की माझ्या कडे लक्ष द्यायला......मी घरी फार वेळ नसतोच पण त्या वेळात पण माझे आईबाबा मला वेळ देत नाही.... खरं सांगू का बाप्पा, मला ना पैसे नकोत, ड्रेस पण नको मी अभ्यास पण करेल.... फक्त त्यांचा थोडासा वेळ हवा आहे. तू जरा त्याचे बघशील का????

आणि हो बाप्पा,

माझ्या आईवडिलांना मी तुझ्याजवळ बोललो हे सांगू नको हा प्लिज.... नाहीतर ते मला बोर्डिंग स्कुल मध्ये टाकतील.... 

तू ना खूप लकी आहेस देवबाप्पा, तुझे आईवडील दिवसभर तुझ्या सोबत असतात. त्यांचे काम असते मी समजू शकतो पण मला सुद्धा त्यांचा वेळ हवाच ना....

          ( एव्हाना त्याच्या वडीलाने लॅपटॉप सोडले होते आणि तो सुद्धा भावुक झाला होता. पण लगेच तो सावरला. त्याच्या लक्षात आले की स्वरा अजूनही रडते आहे.

 तेव्हा तो बोलला:  कसे असतात ना हे आई वडील, थोडा वेळ द्यायला हवा ना आपल्या मुलांना....पण तू रडू नकोस, एवढे चालायचंच ग.... आपला मुलगा असे कधीच बोलणार नाही। यापुढे त्याचे आईवडील लक्ष देतील.....! )

ती पुनः आपले डोळे पुसत म्हणाली ,

अंशची आई (स्वरा ) : तुला ठाऊक आहे हे कोणत्या मुलाने पत्र लिहले आहे.

तो म्हणाला, कोणी लिहले आहे????


आणि पत्रात बघत ती शेवटचे नाव सांगू लागली..…..


तुझ्याच मित्र,

    अंश



( कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जनजागृती हा एकमात्र उद्देश आहे. काही प्रसंग आपल्याशी जुळत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आजच्या परिस्थिती ला बघून माझे लिखाण आहे.... कथा कशी वाटली ते नाही सांगितले तरी चालेल पण त्यातून आपण काहीतरी शिकले असाल तर ते मात्र कळवा)


                                                                                                                              लेखिका,                                                                                                                                 तेजस्विनी प्र.राऊत



नोट : लवकरच तुम्हा सर्वांना वाचायला आवडेल अश्या प्रेम कथा घेऊन येत आहोत. त्यांची लेटेस्ट माहिती मिळण्यासाठी ब्लॉग सबस्क्राईब कराल !!!

आमच्या इतर लेख आणि  गोष्टी :

१. त्याचे ते निशब्द उत्तर.....

२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.

३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण

४. सुंदरता आणि चारित्र्य...


 ( आमच्या कथा आवडत असतील तर इतराना पाठवत रहा आणि प्रतिक्रिया देत रहा त्यामुळे आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते. नवीन गोष्टींसाठी नक्की सबस्क्राईब आणि शेअर कराल..धन्यवाद )

Comments

  1. Fabulas...... next generation chy babtit asach ghadel

    ReplyDelete
  2. मस्त लिहीलात ताई! लिखाणात नवखेपणा (rawness/originality) आहे, जे चांगलं लक्षण आहे.

    काही प्रामाणिक रचनात्मक टीका - स्वल्पविरामानंतर आणि विरामानंतर एक जागा (space) सोडा‌. लहान मुलाच्या तोंडी 'जातीने लक्ष' वगैरे शब्द आणि लांब वाक्ये टाळा (innocence साठी). बाकी शुद्धलेखनात काही खूप जास्त अशा अडचणी नाहीत. लिहत रहा.

    ReplyDelete
  3. Nice. It really happening in Urban lifestyle

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरप्राईज...(भाग दोन)

                                                                                              मागील भाग >  भाग एक वरून... भाग दोन - आज शौर्याचे लग्न होते, आनंदाचा क्षण होता.घरात घाई गडबड सुरू झाली. सकाळचे सहा वाजले होते आणि तिला आकाश च्या फोन ने जाग आली,... गुड मॉर्निंग प्रिन्सेस..... व्हेरी गुड मॉर्निंग आकाश.... झाली तयार... तुझ्या फोन ने जाग आली, रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले.  तुझी झोप मोड केली का मी??? अरे नाही उलट उठवून बरे केलेस नसता मला सगळे आवरायला वेळ झाला असता... बर तू हो फ्रेश,  मॅडम लग्नात बोलवालं ना मला...... आकाश मस्करी च्या मूड मध्ये म्हणाला तिनेही त्याला मस्करी ने प्रतिसाद दिला, बघू मूड झाला तर बोलवेन..... दोघांनही फोन ठेवले व तयारीला लागले..... लग्नघटिका जवळ आली,दोघेही मांडवात बसले, चंद्र तारे ही लाजेल असे दोघेह...

त्याचे ते निशब्द उत्तर.....

                                      Source Image: Google                                    आज सहज बाहेरून आवाज आला म्हणून गॅलरीमध्ये जाऊन बघितले. काही मुले खाली खेळत होती. दुपारचे बारा वाजले होते आणि ऊन ही कडाक्याच होत. ती मुले साधारणतः काही आठ वर्षाची तर काही अकरा-बारा वर्षांची होती.  मी दार उघडताच त्या एका मुलांनी मला विचारले. "ताई ग, आमच्या जवळचा फडा घेतेस का...???"  मी आधी त्यांच्याकडे बघितलं. त्याची अवस्था काही बरी नव्हती. काही पुटळे जवळ होते एक छोटाशी बॉटल होती पण ती रिकामीच होती. आणि त्यांच्यातील सगळ्यात लहान मुलगी "घरी चल ना..." चा तकादा लावत होती. मोठी मुलगी तिला बळेच गप करत होती.  त्या मुलाने मला पुन्हा विचारले, " ताई खूप चांगले आहेत फडे, घ्या ना....." मला त्यांच्याकडे बघून फार वाईट वाटत होतं, मी त्याच्या पायाकडे ...

साथ - एक प्रेमकथा

भाग एक - समिधा तिच्या बहिणीच्या घरी गेली होती, समिधाची बहीण मेधाने तिला काही कामानिमित्य घरी नेले होते. मेधा ही प्लॅट मध्ये राहत होती.  तिच्याच खालच्या फ्लोअर वर अनुजा राहत होती. तिला एक छोटी मुलगी होती. अनुजा व मेधाचे छान जमायचे. अनुजा शतपावली करिता वरच्या मजल्यावर जात असे, तेव्हा मेधाला बोलून जायची. सगळी कामे आटोपल्यावर अनुजा मेधाकडे बसायला यायची. अनुजाला समिधा खूप आवडायची.... आणि मुळात समिधा कोणालाही आवडण्यासारखीच होती. धारदार आणि तीक्ष्ण नाक, लालबुंद आणि कोमल ओठ, इवले इवलेसे कान, टपोरे डोळे आणि त्या डोळ्यात तेज, गालावर नेहमी हास्य, कितीही थकून असली तरी त्याचे हसून स्वागत करणारी समिधा, मध्यम उंची, अंगात हवी तेवढीच, पर्सनॅलिटी तर कोणासही भुरळ पडणारी, कोणीही स्त्री आली तरी तुमची बहीण दिसायला सुंदर आहे हो असेच म्हणायचे. दिसायला जेवढी सुंदर तेवढीच घरकामात देखील पटाईत होती. सगळं घरकाम ती अत्यंत चोखपणे करत होती. आणि हाताला चवदेखील उत्तमच.....कोणत्याही कामाला कधीच नाही म्हणत नसे. बर नुसतीच दिसायला सुंदर किंवा घरकामात पटाईत नव्हती तर अभ्यासात पण हुशार होती. समिधाची PhD  झाली ह...