भाग एक
गायत्रीची आई तिच्या रूम मधील पडदे उघडत गायत्री ला उठवत होती.
अग आई जरा वेळ झोपू दे ना.... आत्ताशी कुठे आठ वाजलेत...
गायत्री डोक्यावर पांघरून सरकवत इकडले तोंड तिकडे फिरवत म्हणाली.
तेव्हा आई तिच्या डोक्यावरील पांघरून काढत जोरात म्हणू लागली,
ऐकलत का गायु चे बाबा, पोरगी आठ वाजलेत तरी उठत नाही आणि बाप काय तर तिचीच बाजू घेणार....
गायत्री उठून तिच्या बाबाच्या कुशीत जाऊन शिरली,
आई हसत म्हणाली,
आता बापलेकीच प्रेम उफाळून येणार....!
असे म्हणत आई स्वयंपाक घरात डबा भरण्यासाठी निघून गेली.
अग गायु, आज कॉलेज ला जाणार नाही का ग ....?
गायत्री बाबांची मिठी घेत म्हणाली,
म्हणजे काय आई जाणारच की, पण बाबाच्या कुशीची ऊब दिवसभर लागते मला.
चल बाबा फ्रेश होऊन आले लगेच.
लवकर ये गायु नाश्ता करायचा थांबतोय मी...
गायत्री पळत जात म्हणाली,
नको नको तू खाऊन घे मी अंघोळ झाली की पळणार आहे, आई टिफिन भरून ठेव उशीर झालाय.
गायत्री ही तिच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी... थोडी लाडवलेली पण स्वभावाने अत्यंत सुंदर... समंजस, मोठ्याचा आदर करणारी, कोणासही घालून पाडून न बोलणारी, थोडी शांत, आणि मनमिळाऊ.... कोणीही बघता क्षणी तिच्या बोलण्याच्या प्रेमात पडावं... तशी दिसायला ही सुंदर होती पण अजून पर्यन्त प्रेमात वैगेरे पडलेली नव्हती. तिचे मित्रमंडळी सुद्धा मोजकेच. फार न बोलणारी गायत्री घरी मात्र खूप बडबड करायची.
गायत्री आपल्या हाताला घडी बांधत येत आईला म्हणाली,
आई माझा डबा भरलाय ना..?
डबा देत आई म्हणाली,
होय घे...आई हो उशीर होणार असेल तर कळवशील.
हो ग आई, love u बाय.
गायत्री वर्गात बसली असताना तिला तिच्या बेंच मध्ये एक चिट्टी सापडली,
तिने ती उघडून बघितली.....
त्यात लिहले होते,
Hello,
तुझं नाव गायत्री,
हे वाचून तर तिला धक्काच बसला. ती ते वाक्य परत वाचू लागली,
तुझं नाव गायत्री, तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला ओळखतो. खूप दिवसांपासून. मला तुझ्याशी बोलायला आवडेल जर तुलाही आवडणार असेल तर मी एक क्लु देतो ते समजून घे तिथे येऊन जा....
घंटा होते दुपारची
घोळका असतो शान त्याची
तुंही जातेस तिथे कधीही
तृप्त होत तहान भूक मनाची..
( विचार कर मी वाट बघतोय )
माझं नाव
( कळेलच लवकर )
हे वाचून तिला हसूच आलं. ते तिच्या मैत्रीनीने पण वाचले त्यात प्रगती म्हणाली,
काय भारी बंदा आहे ग ..!
तोच गायत्री म्हणाली,
क्लु बघ कसा दिलाय ना अर्थ लागतोय ना काही समजत आहे.... कसला बावळट आहे ना... बोलायच तर यावं ना सरळ असले खेळ काय खेळतोय मंद......
प्रगती ते पुन्हा वाचत म्हणाली,
अग गायत्री बघ ना... घंटा, घोळका, दुपारची वेळ, भूक, तहान...
आणि सगळ्या जणी एकदम जोरात ओरडल्या...
कॅन्टीन !!!
सगळ्या जाताय म्हणून गायत्री पण त्यांच्या मागोमाग गेली. खर तर तिला हे असले आवडले नव्हते पण मैत्रिणीमुळे गेली.
सगळे टेबल भरले होते फक्त एक टेबल रिकामा होता. गायत्री दिसताच तो वेटर आला आणि म्हणाला,
मॅडम, हा तुमचा टेबल आहे.
कोणी सांगितलंय तुम्हाला ?
सॉरी मॅडम नाव सांगण्यास मनाई आहे....
प्रगती मॅडम तुम्हाला काय हवंय...?
सारिका मॅडम तुम्ही काय घेणार...?
त्यांची ऑर्डर लिहून घेत असताना गायत्री बोलू लागली तोच वेटर म्हणाला,
मॅडम तुमची ऑर्डर आम्हाला माहिती आहे. ड्राय मंचूरीअन
तुम्हाला कस माहीत....?
Sorry मॅडम. म्हणत तो निघून गेला.
गायत्री रागातच म्हणाली,
कोण असेल हा बावळट ज्याने माझी सगळी माहिती काढली माझं फेसबुक नसतानाही.....
सारिका म्हणाली,
काहीही असो पण खूप भारी दिसतोय हा मुलगा.....
खाऊन झाल्यावर गायत्री म्हणाली, तो काहीतरी बोलणार होता इथे पण तोच का नाही...
वेटर,
जी मॅडम,
बिल द्या !
Sorry मॅडम तुमचं बिल आधीच दिलंय.... आणि हे घ्या.
हातातील चिठ्ठी देत तो निघून गेला.
गायत्री बोलली परत चिट्ठी.
तिने वेटर ला आवाज दिला व पैसे देत म्हणाली,
जो कोणी आहे त्याला सांग आम्ही फुकटचे खात नाही म्हणून....
तो गुपचूप निघून गेला.
गायत्रीच्या हातची चिट्ठी सारिका वाचत म्हणाली,
एवढा राग गायत्री,
गायत्री सारिका कडे बघू लागली,
अग मी नाही या चिठ्ठीतच लिहलय !
चीठ्ठी हातात घेत गायत्री वाचू लागली,
मला माहिती आहे तू फुकटचे खात नाहीस. अग पण पैसे देण्याची खरच गरज नव्हती ती माझ्याकडून पार्टी होती, पण असुदे तू दिलेल्या पैशाचा खाऊ घेऊन अनाथ आश्रम मधील मुलांना देणार आहे....आणि हो रागात आणखीनच गोड दिसतेस....
पुढचा क्लु....
माय बाप नसूनही,
छत्र त्याचे अजूनही आहे.
खरे मायबाप नसेल ही,
पण दाते सगळे पालकच आहेत...
(ओळख बघू)
माझे नाव
( कळेलच लवकर )
पुढील भाग > भाग दोन...👍
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
पुढील भाग उद्या याच आमच्या ब्लॉग वर. आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे ( मराठी लेख व कथा ) क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे भाग उपलब्ध होतील.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. हाक...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
Nice story
ReplyDeleteInteresting Tejswini ! Keep it up
DeleteVery sunspencible story!! keep it mam
ReplyDelete