Skip to main content

Posts

झुंज.....

नीताची नववी झाली होती. दहावीचे वर्ष म्हणून ती विशेष लक्ष देत होती. पण म्हणतात ना, दुधात एक लिंबाचा थेंबही दूध नासण्यास समर्थ आहे. तिचा घरात संकटाचे वारे वाहू लागले. आणि त्या वाऱ्याचा तिच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. घरची परिस्थिती बेताची, त्यात खाणारी तोंडे भरपूर, त्यामुळे शिक्षण फार क्षुल्लक वाटू लागले.घरच्यांनी यापुढे शिकायचे नाही. दोन पैसे आणायला मदत करायची असे सांगून हातातील पुस्तक घेत विळा दिला. शाळेत जाऊन टी सी ची मागणी केली. शिक्षकाने तिला प्रेमाने विचारले, बाळ, तू हुशार मुलगी, मग असे शाळा सोडण्याचा निर्णय का ???? सर, मलाही शाळा सोडायची इच्छा नाही असे म्हणत तिने घरची सगळी कहाणी सांगितली. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी चर्चा करत तिच्या घरच्यांशी बोलायचे ठरवले. नमस्कार,मी नीताच्या शाळेतील शिक्षक. माझं नाव, रमेश पाटील मी नीताचा वर्गशिक्षक, अस होय, या की मास्तर, बसा, आव ये रुखमे, मास्तरासनी प्याया पाणी आन की... रुखमा डोक्यावरचा पदर सावरत पाणी घेऊन आली, पाणी दिले आणि मास्तराच्या तोंडाकडे एकटक पाहू लागली. अव ये रुखमे, अशी अधाशागत काय पायलीस, जा, चा टाक की, नको नको, मला काही नको मी आपल्याल...
Recent posts

साथ - एक प्रेमकथा

भाग एक - समिधा तिच्या बहिणीच्या घरी गेली होती, समिधाची बहीण मेधाने तिला काही कामानिमित्य घरी नेले होते. मेधा ही प्लॅट मध्ये राहत होती.  तिच्याच खालच्या फ्लोअर वर अनुजा राहत होती. तिला एक छोटी मुलगी होती. अनुजा व मेधाचे छान जमायचे. अनुजा शतपावली करिता वरच्या मजल्यावर जात असे, तेव्हा मेधाला बोलून जायची. सगळी कामे आटोपल्यावर अनुजा मेधाकडे बसायला यायची. अनुजाला समिधा खूप आवडायची.... आणि मुळात समिधा कोणालाही आवडण्यासारखीच होती. धारदार आणि तीक्ष्ण नाक, लालबुंद आणि कोमल ओठ, इवले इवलेसे कान, टपोरे डोळे आणि त्या डोळ्यात तेज, गालावर नेहमी हास्य, कितीही थकून असली तरी त्याचे हसून स्वागत करणारी समिधा, मध्यम उंची, अंगात हवी तेवढीच, पर्सनॅलिटी तर कोणासही भुरळ पडणारी, कोणीही स्त्री आली तरी तुमची बहीण दिसायला सुंदर आहे हो असेच म्हणायचे. दिसायला जेवढी सुंदर तेवढीच घरकामात देखील पटाईत होती. सगळं घरकाम ती अत्यंत चोखपणे करत होती. आणि हाताला चवदेखील उत्तमच.....कोणत्याही कामाला कधीच नाही म्हणत नसे. बर नुसतीच दिसायला सुंदर किंवा घरकामात पटाईत नव्हती तर अभ्यासात पण हुशार होती. समिधाची PhD  झाली ह...

सरप्राईज... (भाग अंतिम)

                                                                                                                        भाग सहा वरून...   भाग अंतिम - शौर्या ने बाहेरचे सगळे आटोपले आणि स्वयंपाक केला. सगळ्यांची जेवण झाली आणि ती रूम मध्ये गेली. आकाश बाहेरच बाबांबरोबर गप्पा करत होता तिने मस्त मेकअप केला. आणि तिने  आकाश ला मॅसेज केला..... तुझं शेवटचं सरप्राईज इझ वेटिंग डिअर...... तो लगेच तिथून उठला आणि रूम मध्ये गेला. तिला बघताच आकाश चा तोल सुटला. ती इतकी सुंदर दिसत होती की तो तिच्याकडे बघून पुरता गोंधळला.... तिने त्याचा हात धरून आणले.... आकाश असा काय बघतोय..... पुन्हा हरवलोय मी तुझ्या सौन्दर्यात.... काहीही काय बोलतोय..... तो तिच्याज...

सरप्राईज... (भाग सहा)

                                                                                                                                 भाग पाच वरून... भाग सहा - सकाळीच आकाश ला जाग आली. त्याने बघितले, शोर्या डोके टेबल वर ठेवून झोपली होती, तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या अंगावर पांघरून टाकले. तोच तीला जाग आला...डोळे पुसत ती म्हणाली, व्हेरी गुड मॉर्निंग आकाश... गुड मॉर्निंग प्रिन्सेस..... जा लवकर अंघोळ कर, सोबत कॉफी पिवूया.... आलेच....म्हणत ती बाथरूमकडे जायला निघाली आणि लगेच वापस आली व तिने आकाशला पाठीमागून हग केले..... Sorry आकाश...... त्याने दोन्ही हातानी तिला समोर घेतले आणि समोरून मिठीत घेतले व म्हणाला, तू मला कोणत्य...

सरप्राईज... (भाग पाच)

                                                                                                                            भाग चार वरून... भाग पाच - शौर्या ने पटापट फाईल आपल्या बॅग मद्ये घेतल्या आणि सुसाट वेगाने घरी पोहचली.... घरात येताच तिने किल्ली भिंतीला लावली आणि घड्याळाकडे बघीतले.... काटा 5 वर जाऊन पोहचला होता... तिला वाटले आता आपले काही खरे नाही, दोन तासाने लेट पोहचले, ती रूम मध्ये गेली. तिने हात पाय धुतले, आणि बाहेर येताच आई रूममध्ये आल्या.  आई, सॉरी..... खूप प्रयत्न केला पण दिलेल्या वेळेत पोहचता नाही आले.....  अग मला माहित होते, नको काळजी करू.....  आईने आपल्या पुढील हात समोर केला.... ही घे साडी...घा...

सरप्राईज.... (भाग चार)

                                                                                                                       भाग तीन वरून... भाग चार - सकाळीच उठून शौर्याने भराभर उरकले आणि स्वयंपाक घरात गेली. तिथे आई स्वयंपाकाची तयारी करतच होत्या ती त्यांच्या जवळ गेली व म्हणाली, आई, आज स्वयंपाक मी बनवते..... काय काय बनवायचे..... आज तू फक्त आराम करायचा..... पण आई मी बनवेल.....म्हणजे येतं मला थोडं थोडं बनवायला.... अग आज नको..... ऑफिसला जायचे ना तुला..... हो पण वेळ आहे आई.... जा बस आणि नाश्ता करून घे..... आपण सोबत करूया ना आई..... अग आम्ही नंतर करतो..... बर आई मी बाबा आणि आकाश ला देते.... अग बाई, तू तुझेच आवर...... आई, थोडा वेळ आहे माझ्याकडे...... ...

सरप्राईज...(भाग तीन)

                                                                                                                          भाग दोन वरून... भाग तीन - आकाश ने त्याच्या घरच्यांना कसे बसे समजावले आणि शौर्याला ऑफिस मध्ये जायला परवानगी मिळाली. तिने आकाश चे आनंदी मनाने आभार मानले.... लग्नाला पाच- सहा दिवस न होत की दोघांनी ऑफिस सूरु केले. आकाश च्या वडिलांना त्यांची परिस्थिती समजत होती व आईला समजावून सांगणे जरा दोघांसाठी अवघड होते. अशावेळी सासरे खूप जमवून घ्यायचे. बघता बघता शौर्या च्या मासिक धर्माचे पाच दिवस सम्पले. आणि शौर्याची सासु शौर्याजवळ आली. शौर्या लॅपटॉप घेऊन कामात होती. तीचे लक्ष जाताच ती उठली..... आई, तुम्ही .... या ना.. काय कर...

सरप्राईज...(भाग दोन)

                                                                                              मागील भाग >  भाग एक वरून... भाग दोन - आज शौर्याचे लग्न होते, आनंदाचा क्षण होता.घरात घाई गडबड सुरू झाली. सकाळचे सहा वाजले होते आणि तिला आकाश च्या फोन ने जाग आली,... गुड मॉर्निंग प्रिन्सेस..... व्हेरी गुड मॉर्निंग आकाश.... झाली तयार... तुझ्या फोन ने जाग आली, रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले.  तुझी झोप मोड केली का मी??? अरे नाही उलट उठवून बरे केलेस नसता मला सगळे आवरायला वेळ झाला असता... बर तू हो फ्रेश,  मॅडम लग्नात बोलवालं ना मला...... आकाश मस्करी च्या मूड मध्ये म्हणाला तिनेही त्याला मस्करी ने प्रतिसाद दिला, बघू मूड झाला तर बोलवेन..... दोघांनही फोन ठेवले व तयारीला लागले..... लग्नघटिका जवळ आली,दोघेही मांडवात बसले, चंद्र तारे ही लाजेल असे दोघेह...

सरप्राईज... (भाग एक)

भाग एक - शौर्या ची आज हळद होती. निदान आज तरी होणाऱ्या नवऱ्याला निवांत फोनवर बोलता येईल म्हणून आनंदात होती. पण कसले काय, हळदीच्या दिवशी तिला ऑफिस मध्ये जावं लागलं. सगळे पाहुणे घरात आणि नवरी काय तर ऑफिस मध्ये गेली होती. तिने कामाला आधी महत्व द्यायचे ठरवले होते. शौर्या पेशाने पी एस आय होती. त्यामुळे आज तिला अचानक जावे लागले, आई चाही पारा चढला होता. हळदीच्या दिवशी कोणी काम करतात का??? म्हणून आई चिडत होती.... शौर्याचे लग्न ठरून जेमतेम एक महिना सुद्धा झाला नव्हता. दोघांच्या सुट्या आणि वेळ कसा मिळेल त्या अनुषंगाने लग्नाची तारीख ठरवली होती. लग्न जुळण्यापासून दोघांचा वेळ काही मिळत नव्हता. कधी  शौर्या कामात तर कधी आकाश कामात असायचा. आकाश हा शौर्याचा होणारा नवरा होता. त्यामुळे दोघांना पाहिजे तसा वेळ आणि समजून घेणे जमले नव्हते. ही घरी येताच हळद लागली. आकाश चे फोन वर फोन येत होते. म्हणजे तसे शौर्या ने वचन दिले होते की आज ती त्याला बोलायला पूर्ण वेळ देईल. हळद उरकून ती आली आणि आकाश ला फोन लावला.  हॅलो , काय अग, किती वेळचा फोन लावतोय. उचलत का नाही. Sorry मला अचानक ऑफिस मध्ये जावे लागले... आज...

एक चिट्ठी... ( भाग अंतिम )

                             (  भाग एक < येथे वाचा )                                                                                                     भाग पाच वरून... भाग अंतिम.... एवढेच चिठ्ठी त त्याने लिहले.गायत्री ती चिठ्ठी वाचतच उठली आणि तिने अमित ला घट्ट मिठी मारली. आणि दोघेही अश्रूला वाट करून देत होते.  अमित तुला माहीत असूनही का तू काल माझ्या जवळ आलास. का तुझं आयुष्य बरबाद केलंस अमित....मला एड्स कसा झाला ते माझ्यासाठी महत्वाचे नाही पण तुला माझ्यामुळे एड्स नको व्हायला.... एका रात्रीत तुझं आयुष्य का वाया घातलं  मला थांबूउ शकला असतास तू अमित.... अमित तीच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला, मल...